Join us
Daily Top 2Weekly Top 5

सप्तपदीपासून ते कानपिळीपर्यंत! दणक्यात झालं गौतमीचं लग्न; समोर आला लग्नाचा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 10:13 IST

1 / 9
लोकप्रिय अभिनेत्री गौतमी देशपांडे हिचं नुकतंच लग्न झालं आहे. स्वानंद तेंडूलकरसोबत गौतमीने लग्नगाठ बांधली आहे.
2 / 9
गौतमीच्या लग्नातील प्रत्येक सोहळा खास ठरला. त्यामुळे तिच्या मेहंदी सोहळ्यापासून ते लग्नापर्यंतच्या प्रत्येक विधी, कार्यक्रमाची चर्चा रंगली.
3 / 9
गौतमी आणि स्वानंद यांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्येच आता गौतमीने सुद्घा काही निवडक फोटो शेअर केले आहे.
4 / 9
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौतमीने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचे काही मोजके फोटो शेअर केले आहेत.
5 / 9
गौतमीने लग्नात मोती आणि गोल्ड कलरची छान साडी नेसली होती. सोबतच लाइट पिंक रंगाचं त्याला साजेसं ब्लाऊजही परिधान केलं होतं. तिच्या या लूकला मॅच होणारा हलकासा मेकअप आणि साधीशी हेअर स्टाइलही तिने केली होती.
6 / 9
स्वानंदनेही गौतमीच्या साडीला मॅच होईल असे कपडे घातले होते.
7 / 9
गौतमीने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वानंदच्या कानपिळीचा विधी पार पडताना दिसत आहे. यात गौतमीच्या भावांसोबत मृण्मयी सुद्धा दिसून येत आहे.
8 / 9
गौतमी आणि स्वानंद यांची गाठ बांधतांना मृण्मयी.
9 / 9
गौतमीचा कँडीड फोटो सोशल मीडियावर चर्चेत येत आहे.
टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडेटेलिव्हिजनसेलिब्रिटी