Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझी फसवणूक झाली, मला आई व्हायचं होतं पण..." अखेर मानसी नाईकने सांगितली तिची बाजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 13:18 IST

1 / 9
मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) अतिशय लोकप्रिय आहे. 'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या गाण्यांमुळे ती अचानक प्रसिद्धीझोतात आली. मानसी नाईकने 'चार दिवस सासूचे' मालिकेतून अभिनयात पदार्पण केलं होतं.
2 / 9
मानसी नाईक अभिनयासोबतच उत्तम डान्सरही आहे. ती पहिल्याच सिनेमात किसींग सीन देत चर्चेत आली होती. मोठ्या घाऱ्या डोळ्यांची मानसी जिला मराठीतील ऐश्वर्या रायही म्हटलं गेलं. गेल्या काही दिवसांपासून मानसी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे.
3 / 9
नुकतंच मानसीने भार्गवी चिकमुलेच्या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये तिने लग्न, घटस्फोट यावर मनमोकळेपणाने संवाद साधला. मानसीची तिच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड फसवणूक झाली. या मुलाखतीत तिने तिची बाजू मांडली जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला.
4 / 9
मानसी म्हणाली, 'मला लग्न करायचं होतं. माझं कुटुंब असावं असं मला वाटत होतं. पण झालं वेगळंच. फक्त प्रसिद्धी, रील्सचा हा प्रवास होता. जे मला सांगण्यात आलं ते सगळं खोटं नव्हतं. आता कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. पण माझं जे लग्नाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही. तरी मी ते नक्की करेनच माझा प्रेमावरचा विश्वास उडालेला नाही.'
5 / 9
'लग्नात जेव्हा कळतं की काहीतरी चुकतंय तेव्हा कोणतीही मुलगी आधी लग्न टिकवण्याचा प्रयत्न करते. तेच मी केलं. पण एक वेळ अशी आली की आता बस्स झालं. मला वाटतं ममता ही फक्त आईची असावी बायकोची नाही. मी आई म्हणून सगळ्या गोष्टी केल्या. पण इतकंही कोणाला लाडोबा बनवायचं नाही हे मला कळलं.'
6 / 9
'एक मुलगी लग्न करते. तिच्या बकेट लिस्टमध्ये ती एक इच्छा असते की लग्न करायचं, कुटुंब असावं. चुडा, त्यात फोटो, सिंदुर हे मी सगळं प्रेमाने केलं. सप्तपदी, होमहवन, मेहंदीचा अर्थ काय हे ज्यांना माहितच नाहीए आणि अनादर करायच्या पलीकडे माहित नाही म्हणल्यावर काय करणार.'
7 / 9
मी ग्लॅमरस दिसत असले तरी माझे पाय जमिनीवर आहेत. मला माहित आहे की मला काय हवंय. मी जर स्वत: ते शिकले किंवा माझ्या अंगी मी ते आणलं तर मी माझ्या मुलांना शिकवेल ना. मला आई व्हायचं होतं..म्हणूनच मी रडले.' असंही ती म्हणाली.
8 / 9
सध्या मानसीच्या घटस्फोटाचा वाद कोर्टात सुरु आहे. तिने नवऱ्यावर आरोप केले आहेत. त्यावर चौकशी सुरु आहे. मानसीने १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरासह लग्न केलं होतं. त्यांचे रील्स व्हिडिओ नेहमी व्हायरल व्हायचे. इंडस्ट्रीमध्ये ते लोकप्रिय कपल होतं.
9 / 9
सध्या मानसी या सगळ्या कठीण काळातून बाहेर पडली आहे. आता तिला काम करायचंय. सिनेमा करायचा आहे. मात्र अजूनही सिनेमा मिळत नाही याची खंत तिने मुलाखतीत व्यक्त केली.
टॅग्स :मानसी नाईकमराठी अभिनेतालग्नघटस्फोट