Join us

Malaika Arora : क्लासमधून गायब असायची मलायका अरोरा; 'या' चुकीमुळे आईला सतत कॉलेजमधून यायचा कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:35 IST

1 / 11
मलायका अरोराने कॉलेजमध्ये असतानाच मॉडेलिंगच्या जगात पाऊल ठेवलं आणि अखेरीस या इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण केलं. तिला आता तिचे सुरुवातीचे दिवस आठवले आहेत.
2 / 11
मलायकाने अलीकडेच खुलासा केला की, तरुण वयात काम करण्याची तिची प्रेरणा इंडिपेंडेंट होण्यासाठी होती. मात्र, हा मार्ग आव्हानांनी भरलेला होता. कर्ली टेल्सच्या नवीन एपिसोडमध्ये, मलायकाने सांगितलं की, तिची आई जॉयस पॉलीकार्पला तिच्या कमी अटेंडेन्समुळे कॉलेजमधून वारंवार कॉल यायचे.
3 / 11
संभाषणादरम्यान मलायकाला विचारण्यात आलं की, तिने कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगची सुरुवात कशी केली? यावर तिने उत्तर दिले, 'मी खरं तर जय हिंदमध्ये माझं कॉलेजचं दोन वर्षांचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी मॉडेलिंगला सुरुवात केली.'
4 / 11
'हे खूप कठीण होत होतं कारण माझी कॉलेजमध्ये अटेंडेन्स चांगली नसल्यामुळे माझ्या आईला कॉलेजमधून फोन यायचे.' यानंतर मलायकाने काही जाहिराती आणि काही शो करायला सुरुवात केली.
5 / 11
अभिनेत्रीने आईला सांगितलं की, मला काम करायचं आहे कारण मला इंडिपेंडेंट व्हायचं आहे. याचदरम्यान मलायकाला विचारण्यात आलं की, ती लोकप्रियता शोधत आहे की स्वातंत्र्य?
6 / 11
मलायका म्हणाली, “मला इंडिपेंडेंट व्हायचं होतं. मला असं काहीतरी करण्याची गरज होती ज्यामुळे मला काही पैसे मिळतील. जोपर्यंत पैशाचा संबंध आहे, पैसा हे तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचे बायप्रोडक्ट आहे.'
7 / 11
'मला माझं घर चालवण्याची गरज नव्हती पण मला वाटलं की, मी माझ्या आईला मदत केली पाहिजे, हा एक चांगला मार्ग आहे कारण ती सिंगल मदर होती. मला वाटलं की अशा परिस्थितीत मदत करणे चांगलं असेल.'
8 / 11
'माझ्या आईने माझ्याकडून कधी अशी अपेक्षा केली नव्हती पण मोठी मुलगी म्हणून हे माझं कर्तव्य आहे असं मला वाटलं.' मलायका अनेकदा तिची आई जॉयससोबतचे फोटो शेअर करत असते.
9 / 11
२०२२ मध्ये ग्राझियाला दिलेल्या मुलाखतीत, मलायका तिच्या आईसोबतच्या तिच्या बॉन्डबद्दल बोलली. ती म्हणाली की, तिने तिच्या आईला एका नवीन आणि अद्वितीय दृष्टीकोनातून पाहिलं आहे.
10 / 11
'माझं बालपण खूप चांगलं होतं, पण ते सोपं नव्हतं. खरं तर मागे वळून पाहिलं, तर मी अशांत हा शब्द यासाठी वापरेन. पण कठीण प्रसंगही तुम्हाला आयुष्यात महत्त्वाचे धडे शिकवतात' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
11 / 11
टॅग्स :मलायका अरोरामहाविद्यालयबॉलिवूड