1 / 11बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशिपमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अर्जुन आणि मलायकाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. 2 / 11परस्पर संमतीने मलायका आणि अर्जुन एकमेकांपासून वेगळे झाल्याचं बोललं जात होतं. मात्र याबाबत अद्याप मलायका किंवा अर्जुनकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे खरंच त्यांच्यात बिनसलं आहे का? याबाबत चाहते संभ्रमात आहेत. 3 / 11मलायका 50 वर्षांची आहे, तर अर्जुन 38 वर्षांचा आहे. दोघांच्या वयात 12 वर्षांचं अंतर आहे. अशा परिस्थितीत मलायकाला नात्याच्या सुरुवातीला तिच्यापेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत असल्याने ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. 4 / 11आता मलायका अरोराचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री स्टँडअप कॉमेडी करताना अर्जुन आणि तिच्या वयातील अंतर याबद्दल बोलताना ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.5 / 11व्हायरल व्हिडीओमध्ये मलायका म्हणताना दिसली - 'मी फक्त म्हातारी नाही, तर मी एका तरुण मुलालाही डेट करत आहे. हिंमत पाहा. लोकांना वाटतं की मी अर्जुनचं आयुष्य उद्ध्वस्त करतेय, पण मी लोकांना सांगू इच्छिते की, मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही.'6 / 11मलायका पुढे हसत हसत म्हणाली, 'असं तर नाही की तो (अर्जुन) शाळेत जात होता, त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं आणि मी त्याला म्हणाले, माझ्यासोबत चल... आम्ही डेटवर जातो तेव्हा तो क्लास बंक करतो असंही नाही'7 / 11'ज्या रस्त्यावर तो पोकेमॉन पकडत होता तिथे मी त्याला पकडलं नाही. तो तरुण आहे' असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. मलायका आणि अर्जुन अनेकदा व्हेकेशन्स आणि डिनर डेटवर जात असतात.8 / 112018 पासून अर्जुन आणि मलायकाच्या लव्हस्टोरीची चर्चा होती. तेव्हा पहिल्यांदा दोघांनी एकत्र इव्हेंटला हजेरी लावली होती. नंतर मलायकाच्या 45व्या वाढदिवशी त्यांनी एकत्र फोटो पोस्ट करत नातं जाहीर केलं होतं. 9 / 11मालदीवमधील त्यांच्या व्हॅकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. काही दिवसांपूर्वी मलायकाने लेकाच्या पॉडकास्टमध्ये मात्र अर्जुनविषयी काहीही सांगितले नाही. 10 / 11गेल्या अनेक दिवसांपासून दोघं एकत्रही दिसले नाहीत. ब्रेकअपच्या चर्चांनंतर मलायकाने क्रिप्टिक पोस्टही शेअर केली होती. त्यामुळे या ब्रेकअपच्या चर्चांना आणखी उधाण आलं. 11 / 11