Join us
Daily Top 2Weekly Top 5

अचानक लग्न करणार असल्याची बातमी देऊन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या अभिनेत्रीने शेअर केले फोटो, चाहत्यांना आनंद

By देवेंद्र जाधव | Updated: March 8, 2026 14:30 IST

1 / 7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा लाडका शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्न करणार असल्याची गुड न्यूज शेअर करुन सर्वांना सुखद धक्का दिलाय
2 / 7
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे ईशा डे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणारी ईशा लवकरच लग्न करणार आहे
3 / 7
ईशाने ग्रहमख विधीचे फोटो शेअर करुन सर्व चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ईशाची मैत्रीण आणि कुटुंबियांनी अभिनेत्रीचे हे लग्नाआधीचे विधी केले
4 / 7
ईशा या फोटोत खूप आनंदात दिसत आहे. ईशाने मोरपिशी रंगाची लाल पदर असलेली खास साडी परिधान करुन कॅमेरात पोझ दिली आहे.
5 / 7
ईशा डेचा होणारा नवरा कोण आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तरीही ईशाने अचानक ही बातमी दिल्याने चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे
6 / 7
ईशा डे ही सर्वांची आवडती अभिनेत्री. गेली अनेक वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून ईशा चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.
7 / 7
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शिवाय ईशाने गुलकंद या मराठी सिनेमात काम करुन सर्वांंचं मन जिंकलं. ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सर्वांना उत्सुकता होईल. आगामी दिवसात त्याचा उलगडा होईलच
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासेलिब्रेटी वेडिंगबॉलिवूडलग्न