केतकी थत्ते ते कादंबरी कदम! पाहा सध्या काय करतात 'या' लोकप्रिय मराठी अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 16:14 IST
1 / 8सारा श्रवण - पिंजरा या मालिकेमध्ये सारा श्रवण झळकली होती. मात्र, या मालिकेनंतर तिने कलाविश्वापासून ब्रेक घेतला. सध्या सारा तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत असून तिला एक मुलगा देखील आहे.2 / 8गौरी वैद्य- दे धक्कामध्ये सायली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे गौरी वैद्य. गौरीने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं. मात्र, आता ती पूर्वीसारखी फारशी कलाविश्वात दिसत नाही.3 / 8मृण्मयी लागू - दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांची मुलगी म्हणजेच मृण्मयी लागू. दोघात तिसरा आता सगळ विसरा, मुक्काम पोस्ट लंडन, हॅलो सुंदरी या हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली मृण्मयी लागूदेखील आता मराठी कलाविश्वात दिसत नाही. परंतु, हिंदी कलाविश्वात तिने जम बसवला आहे. थ्री इडियट, तलाश या चित्रपटांसाठी तिने असिस्टंट डिरेक्टर म्हणून केलं आहे. तसंच दंगल, पिके आणि गुलाब गॅंग या चित्रपटांसाठी स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणूनही काम केलं आहे.4 / 8 नेहा गद्रे- मन उधाण वाऱ्याचे या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. या मालिकेनंतर ती मोकळा श्वास या चित्रपटामध्येही झळकली गोती. मात्र, २०१९ मध्ये प्रियकर इशांत बापटसोबत लग्न करुन तिने कलाविश्वाला रामराम केला. सध्या ती परदेशात स्थायिक असल्याचं म्हटलं जातं.5 / 8नारायणी शास्त्री - पक पक पकाक या सिनेमा नारायणी शास्त्री झळकली होती. नारायणीने अनेक हिंदी मालिकांमधून तिच्या अभिनयाची छाप पाडली. क्योंकि सास भी कभी बहू थी, श्श्श्श…कोई है, संजीवनी अश्या प्रसिद्ध हिंदी मालिकांमध्ये ती बघायला मिळाली मराठीमध्ये मात्र ती पक पक पकाक आणि रुह या दोनच चित्रपटांमध्ये झळकली. 6 / 8केतकी थत्ते - आभाळ माया, गलगले निघाले, काटकोन त्रिकोण अशा कितीतरी मालिका, चित्रपट आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे केतकी थत्ते. गेल्या कित्येक वर्षांपासून केतकीचा मराठी कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, ती उत्तम कथ्थक नृत्यांगना असल्यामुळे अनेक डान्सचे शो करते. तसंच ती इंग्रजी, हिंदी नाटकांमध्येही काम करते.7 / 8कादंबरी कदम - अवघाची संसार, तुजविण सख्या रे या मालिकांमध्ये झळकलेली लाडकी अभिनेत्री म्हणजे कादंबरी कदम. कादंबरीचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ती सक्रीय आहे. कादंबरीला कार्तिक नावाचा लहान मुलगादेखील आहे.8 / 8नीलम शिर्के - वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती या मालिकांसह अनेक चित्रपटांमध्ये झळकलेल्या नीलम शिर्केचाही कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. नीलमचं लग्न झालं असून ती रत्नागिरी शहरात राहत असल्याचं सांगण्यात येतं.