Join us

Karisma Kapoor : हुस्र है सुहाना...! 47 वर्षांच्या ‘लोलो’चं गजब फोटोशूट, फोटो पाहून अनुष्का शर्माही पडली प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 16:57 IST

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आता चित्रपटांत आधीइतकी अ‍ॅक्टिव्ह नाही. पण म्हणून तिची चर्चा कमी नाही. सध्या चर्चा आहे ती तिच्या फोटोंची.
2 / 8
होय, 47 वर्षांच्या करिश्माने एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये तिचा फिटनेस, तिच्या अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.
3 / 8
या फोटोंमध्ये करिश्मा तिची टोन्ड फिगर फ्लॉन्ट करताना दिसतेय. व्हाईट क्रॉप टॉप, डेनिममध्ये ती प्रचंड ग्लॅमरस व हॉट दिसतेय.
4 / 8
करिश्माने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो, तिच्या या अदा पाहून अनुष्का शर्मालाही राहावलं नाही. ती सुद्धा लोलोच्या प्रेमात पडली.
5 / 8
नेहमीच शानदार दिसतेस..., अशी कमेंट अनुष्का शर्माने तिच्या फोटोंवर केली आहे. तर जहान कपूरने लिहिलं, मला वाटलं, जुने फोटो आहेत. अगदी पंचवीशीची दिसते आहेस.
6 / 8
करिश्मा कपूर तिच्या स्टाईल व फॅशनसाठी ओळखली जाते. 90 च्या दशकात टॉपची हिरोईन असलेली ही बाला आजही नव्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते ते म्हणूनच.
7 / 8
करिश्मा कपूरने 90 च्या दशकात बॉलिवूड गाजवले होते. अभिनेत्रीच्या सौंदर्याच्या चर्चा या काळात रंगल्या. अजूनही फिटनेसच्या बाबतीत करिश्मा बॉलिवूडमधील तरुण अभिनेत्रींना टक्कर देते.
8 / 8
अभिनेत्रीने तिच्या कारकिर्दीमध्ये विविध हिट चित्रपट दिले आहेत. राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, हम साथ साथ हैं, कूली नं. 1 या तिच्या सिनेमांची विशेष चर्चा झाली.
टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूड