1 / 8अभिनेता हृतिक रोशनचा (Hritik Roshan) 'अग्निपथ' सिनेमा चांगलाच गाजला होता. संजय दत्तच्या खलनायकाच्या भूमिकेने तर लोकांचं मन जिंकलं. यासोबतच एका तरुण मुलीने दर्शकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सिनेमात हृतिकच्या लहान बहिणीची शिक्षा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आठवतेय?2 / 8ती अभिनेत्री आहे कनिका तिवारी (Kanika Tiwari). 'अग्निपथ' सिनेमा २०१२ साली आला होता. म्हणजेच सिनेमाला १० वर्ष होऊन गेली आहेत. यासोबतच अभिनेत्री कनिका तिवारीचा लुकही कमालीचा बदलला आहे. आता तिला ओळखणंही कठीण आहे.3 / 8'अग्निपथ' सिनेमात कनिकाने 'शिक्षा' ही व्यक्तीरेखा साकारली होती. सुंदर आणि शांत मुलीची तिची भूमिका होती. हतिक सिनेमात तिचा मोठा भाऊ होता. आपल्या बहिणीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे हृतिक काय हाल करतो हेही सिनेमात दाखवलं आहे.4 / 8अग्निपथवेळी कनिक १० वीच्या परिक्षेची तयारी करत होती. तर आता इतक्या वर्षांनंतर ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. कनिका आता २७ वर्षांची असून ती दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करत आहे. अग्निपथ नंतर कनिकाने साऊथ सिनेमांमध्ये भूमिका साकारायला सुरुवात केली.5 / 8कनिकाने तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषांमध्ये फिल्म्स केल्या आहेत. सध्या साऊथमधील ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 'बॉय मीट्स गर्ल','रंगन स्टाईल','अवी कुमार' या सिनेमात तिने काम केलं आहे.6 / 8कनिका तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.तिचे सध्याचे फोटो पाहिले तर अग्निपथ मधली ही तीच शिक्षा का यावर कोणालाही विश्वास बसणार नाही. कोणतेही आऊटफिट असो कनिका खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते.7 / 8मराठी अभिनेता श्रेयस तळपदेसोबत 'मन्नू और मुन्नी की शादी' सिनेमात कनिका मुख्य भूमिकेत होती. हा एक कॉमेडी सिनेमा होता ज्यामध्ये श्रेयस आणि कनिकाची जोडी होती.8 / 8खूप कमी जणांना माहित आहे की कनिका आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी यांच्यात एक कनेक्शन आहे. कनिका दिव्यांकाची कजिन आहे. (सौजन्य : kanikaatiwariofficial instagram)