Join us

23 वर्षांमध्ये इतका बदललाय 'कहो ना प्यार है'मधील बालकलाकार; प्रसिद्ध अभिनेत्रीशी केलंय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 14:09 IST

1 / 11
हृतिक रोशन याचा 'कहो ना प्यार हैं' हा सिनेमा बॉलिवूडच्या इतिहासातील गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे.
2 / 11
हा सिनेमा रिलीज होऊन २३ वर्ष उलटली मात्र त्याची क्रेझ आजही प्रेक्षकांवर असल्याचं पाहायला मिळतं.
3 / 11
सध्या सोशल मीडियावर या सिनेमातील बालकलाकार अभिषेक शर्मा याची चर्चा रंगली आहे.
4 / 11
अभिषेक शर्मा याने या सिनेमा हृतिकच्या लहान भावाची अमितची भूमिका साकारली होती.
5 / 11
या सिनेमानंतर अभिषेक काही मोजक्या सिनेमांमध्ये झळकला परंतु, त्यानंतर तो अचानकपणे इंडस्ट्रीतून गायब झाला.
6 / 11
हृतिक रोशनच्या लहान भावाच्या भूमिकेत अभिषेक शर्माने मोठी प्रसिद्धी मिळवली. कहो ना प्यार है सिनेमानंतर अभिषेकने इतरही अनेक सिनेमांत काम केलं. पण नंतर तो इंडस्ट्रीतून गायब झाला.
7 / 11
तो बालकलाकार आता मोठा झाला असून त्याला ओळखणंही कठीण आहे. कहो ना प्यार है सिनेमातील हा चिमुकला असल्याचं कोणालाही ओळखता येणार नाही.
8 / 11
अभिषेकने सनी देओलच्या चॅम्पियन या सिनेमातही काम केलं होतं. इकतंच नाही तर त्याला गदर सिनेमाचीही ऑफर मिळाली होती. मात्र, त्याने ती धुडकावली.
9 / 11
सध्या अभिषेक छोट्या पडद्यावर त्याचं नशीब आजमावत आहे. ससुराल सिमर का, दिल मिल गए, दिल दिया गल्ला, हिरो गायब मोड ऑन आणि रम पम पो या मालिकांमध्ये तो झळकला होता.
10 / 11
त्याने माय नेम इज शीला आणि फेसलेस या वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.
11 / 11
अभिषेकचं लग्न झालं असून त्याने २०२२ मध्ये अभिनेत्री कनन शर्मासोबत लग्नगाठ बांधली आहे.
टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजन