Join us

२०२४ मधील हे कमी बजेट असलेले चित्रपट ज्यांनी गाजवलं बॉक्स ऑफिस; तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 14:20 IST

1 / 8
२०२४ मध्ये कमी बजेट असूनही बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचलेला चित्रपट म्हणजे 'मुंज्या'. अवघ्या ३० कोटी रुपयाचं बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. तर जगभरात १२६.२ कोटी कलेक्शन केलं.
2 / 8
अभिनेता राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'स्त्री-२' हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला. २०२४ मधील ब्लॉकबस्टर चित्रपटांपैकी हा एक चित्रपट आहे. १०५ कोटी रुपये इतका खर्च या सिनेमासाठी लागला असून फक्त भारतात 'स्त्री-२' ने ७०८ कोटी इतकी कमाई केली. तर जगभरात ८५२.८ कोटींचा पल्ला गाठला.
3 / 8
हास्य-विनोद आणि भावनिक असणारा 'क्रू' चित्रपटाचीही यंदा चांगलीच चर्चा झाली. या चित्रपटामध्ये करिना कपूर, कृती सनॉन आणि तब्बू यांसारख्या नावाजलेल्या नायिका पाहायला मिळाल्या. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तारखेपासून बॉक्स ऑफिसवर जगभरात ८५२.४ कोटी इतकी कमाई केली.
4 / 8
अजय देवगण आणि आर. माधवन यांचा 'शैतान' हा सिनेमा वश या गुजराती सिनेमाचा रिमेक आहे. हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ८ मार्च या दिवशी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. शिवाय अभिनेता आर माधवनने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलं होतं. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाइड २१३.८ कोटी इतकी कमाई केली.
5 / 8
विकी कौशल आणि तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' हा सिनेमा १९ जुलैला प्रदर्शित झाला. या सिनेमाचं कथानक, कलाकारांचा अभिनय आणि गाण्यांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार 'बॅड न्यूज'ने बॉक्स ऑफिसवर ११३.६ कोटी कमावले.
6 / 8
अभिनेत्री यामी गौतम, प्रिया मणी स्टारर 'आर्टिकल ३७०' या सिनेमाचा यंदा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळाला. फक्त ४० कोटी बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात १०४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
7 / 8
राजकुमार राव याने 'श्रीकांत' मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट नेत्रहीन उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनावर आधारित आहे. ४५ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात ६० कोटींचा व्यवसाय केला.
8 / 8
कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगाव एक्सप्रेस' हा सिनेमा सिनेरसिकांच्या पसंतीस पडला. या सिनेमात प्रतीक गांधी, द्विवेंदू शर्मा, नोरा फतेही, अविनाश तिवारी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. तीन मित्रांच्या गोव्याला जाण्याची धम्माल कहाणी बघायला मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४३.४ कोटी इतका बिझनेस केला.
टॅग्स :बॉलिवूडसिनेमाइयर एंडर 2024