'छावा'साठी विकीची जबरदस्त मेहनत! घोडेस्वारी, लाठीकाठी अन् भरपूर व्यायाम; पैलवानांसारखा होता दिनक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 16:10 IST
1 / 8'छावा' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विकी कौशलने 'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 'छावा'साठी विकीने किती मेहनत केलीय हे त्याने नुकत्याच शेअर केलेले फोटो पाहून कळतं.2 / 8'छावा'साठी विकीने कसून व्यायाय केलाय. शूटिंगमधून जसा वेळ मिळेल तसा विकी भरपूर व्यायाम करुन शरीरयष्टीवर मेहनत करायचा3 / 8'छावा'च्या आधी विकीचं वजन साधारण ७५ किलो होतं. 'छावा'साठी विकीने २५-३० किलो वजन वाढवलेलं दिसतं. 4 / 8'छावा' सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकीला उत्कृष्ट अभिनय करायचा होताच शिवाय बाह्यरुपावरही मेहनत घ्यायची होती. विकी आणि त्याच्या फिटनेस प्रशिक्षकांनी त्याच्याकडून ही मेहनत करवून घेतली.5 / 8जीममध्ये भरपूर व्यायाम करताना विकीला थकवा येणं साहजिक आहे. परंतु 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायचं लक्ष्य त्याच्या डोळ्यांसमोर होतं.6 / 8याचा परिणाम विकीवर चांगलाच झालेला दिसला. विकीने प्रचंड अंगमेहनत घेऊन 'छावा'च्या तयारीत शरीरयष्टी चांगलीच कमावली.7 / 8याशिवाय 'छावा' सिनेमासाठी घोडेस्वारी आणि लाठीकाठीचं उत्तम ट्रेनिंग विकीने घेतली. सिनेमाच्या शूटिंगवेळेस सर्व गोष्टी बघताना खऱ्या वाटाव्यात यासाठी विकीने भरपूर मेहनत केली आहे8 / 8'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ ला रिलीज होणार आहे. लक्ष्मण उतेकर यांनी 'छावा'चं दिग्दर्शन केलंय.