1 / 7सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची चर्चा आहे. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील सेलिब्रिटींनी त्यांच्या अनोख्या फॅशनने जगाचं लक्ष वेधलं. या सर्व सेलिब्रिटींच्या मांदियाळीत नागपूरची मराठमोळी लेक कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली2 / 7 कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकलेल्या या अप्सरेचं नाव आहे मधुलिका जगदाळे. मधुलिका गेल्या अनेक वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीत कार्यरत आहेत3 / 7मधुलिकाची मुलगी जिया जगदाळे सुद्धा फॅशनच्या दुनियेत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे मधुलिका आणि जिया या दोघीही अनेकदा एकाच फॅशन स्पर्धेत भाग घेताना दिसतात4 / 7UMB Elite Mrs India 2024 या फॅशन स्पर्धेत माय-लेकींनी भाग घेतला होता. त्यावेळी मधुलिका स्पर्धेच्या विजेती ठरली. तर त्यांची मुलगी जिया उपविजेती ठरली5 / 7कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सातव्या दिवशी मधुलिकाने रेड कार्पेटवर ग्लॅमरस लूकने हजेरी लावली. मधुलिकाचा ग्लॅमरस लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता6 / 7फॅशनच्या दुनियेत मधुलिका आणि जिया या मायलेकींच्या जोडीची चर्चा आहे. मधुलिका आणि जिया एकत्र आल्यावर आई-मुलगी न वाटता बहीणींचीच जोडी वाटतात7 / 7स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मधुलिकाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यामुळे मधुलिका यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांची शान उंचावली असून इतरांना प्रेरणा दिली आहे.