Join us

भारताच्या माजी IAS अधिकाऱ्याने कान्समध्ये जाऊन रचला इतिहास! फोटोशूट करुन गाजवला रेड कार्पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 13:32 IST

1 / 7
सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची चांगलीच चर्चा आहे. या फेस्टिव्हलमध्ये एक खास गोष्ट घडली आहे. या फेस्टिव्हलमध्ये भारतातील IAS अधिकारी चमकला आहे
2 / 7
अभिषेक सिंह असं त्यांचं नाव असून ते एक माजी IAS अधिकारी आहेत. त्यांनी २०२३ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि अभिनयाच्या क्षेत्रात प्रवेश केला.
3 / 7
अभिषेक सिंह हे पहिले IAS अधिकारी आहेत ज्यांना कान्ससारख्या बहुचर्चित आणि आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हमध्ये झळकण्याची संधी मिळाली
4 / 7
'1946: डायरेक्ट अ‍ॅक्शन डे – द इरेज्ड हिस्ट्री ऑफ बंगाल' या चित्रपटाद्वारे अभिषेक यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. पुढे अनेक सिनेमा, वेबसीरिजमध्ये त्यांनी अभिनय केला.
5 / 7
अभिषेक सिंह यांनी 'दिल्ली क्राइम 2' या नेटफ्लिक्स वेब सिरीजमध्ये अभिनय केला होता. अभिनयाच्या जोडीला अभिषेक यांनी लॅक्मे फॅशन वीक आणि मनीष मल्होत्रा यांच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉकही केला आहे.
6 / 7
अभिषेक सिंह यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे झाला. त्यांचे वडील एक निवृत्त IPS अधिकारी आहेत.
7 / 7
अभिषेक सिंह यांनी कान्समध्ये अनोख्या स्टाईलने रेड कार्पेट चांगलाच गाजवला. याशिवाय हॉलिवूड स्टार्ससोबत फोटोशूट केलं
टॅग्स :भारतकेंद्रीय लोकसेवा आयोगहॉलिवूडकान्स फिल्म फेस्टिवल