Baby's Day Out मधला क्यूट बेबी आठवतोय? जुळ्या भावांनी साकारलेली भूमिका, आता दिसतात एकदम हँडसम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 18:08 IST
1 / 7Baby's Day Out हा ९०च्या दशकातील हॉलिवूडचा सगळ्यात लोकप्रिय सिनेमा. १९९४ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. 2 / 7या सिनेमाचा 'हे बेबी' या नावाने हिंदीतही रिमेक झाला होता. एका छोट्या लहान बाळाला किडनॅप करणाऱ्या तिघांना ते बाळ सळो की पळो करून सोडतं. 3 / 7Baby's Day Out सिनेमातील या छोट्या बिंक नावाच्या बेबीने सगळ्यांनाच भुरळ घातली होती. 4 / 7पण तुम्हाला माहितीये का या गोंडस, निरागस बाळाची भूमिका जुळ्या भावांनी साकारली होती. 5 / 7अॅडम रॉबर्ट वॉर्टन आणि जेकॉब वॉर्टन हे जुळे भाऊ बेबी बिंकच्या भूमिकेत होते. 6 / 7आता ते जवळपास ३० वर्षांचे झाले आहेत. आणि खूपच हँडसम दिसतात. 7 / 7Baby's Day Outनंतर ते कुठल्याच सिनेमात दिसले नाहीत. पण, सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो आहेत.