1 / 7'शार्क टॅंक इंडिया' या शोमुळे चर्चेत आलेली बिझनेसवुमन नमिता थापर सध्या प्रकाशझोतात आली आहे. 2 / 7अलिकडेच १५ मे रोजी तिने 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४' च्या रेड कार्पेटवर आपल्या अदांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. नमिताचा हा लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 3 / 7कियारा अडवाणी, ऐश्वर्या राय तसेच आदिती राव हैदरी या बॉलिवूड अभिनेत्री देखील 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४' मध्ये झळकणार आहेत.4 / 7'शार्क टॅंक' जज नमिता 'कान फेस्टिव्हल २०२४ 'मध्ये दुसऱ्या दिवशी हेम्सवर्थ स्टारर 'फ्यूरियोसा ए मॅड मॅक्स सागा' च्या प्रिमियमध्ये सहभागी झाली. 5 / 7नमिताने लेबनानी फॅशन डिझायनर एलियो अबू फैसल यांने डिझाईन केलेल्या लेग स्लिट तसेच मिंट ग्रीन रंगाचा गाऊन परिधान करून फेस्टिव्हलमध्ये डेब्यू केला. तिचा हा लूक पाहून चाहत्यांनी तिची तुलना चक्क अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत केली. 6 / 7हिंदी टिव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अभिनेत्री दिप्ती साधवानीने देखील रेड कार्पेटवर आपल्या स्टाईल आणि लूकने चाहत्यांची मनं जिंकली. 7 / 7दरम्यान, 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सहभागी होऊन कसं वाटलं? असा प्रश्न नमिताला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, 'खूपच छान वाटतंय, इथलं वातावरण बघा, तिथं फॅशन आहे, तिथं फिल्म आहे, तिथं संगीत आहे,' असं उत्तर तिने दिलं.