Join us

१३ वर्ष इंडस्ट्रीतून गायब! 'CID' मधील इन्स्पेक्टर विवेक आठवतोय? आता ओळखणंही झालंय कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:27 IST

1 / 8
टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो म्हणजे सीआयडी. या क्राइम शो अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
2 / 8
या मालिकेतील प्रत्येक पात्र लोकप्रिय ठरलं. इन्स्पेक्टर दया, अभिजीत आणि एसीपी प्रद्युम्न आणि श्रेया, एडी, पंकज त्यांची संपू्र्ण टीम प्रेक्षकांची लाडकी ठरली होती.
3 / 8
या लोकप्रिय मालिकेतील आणखी एक पात्र जे प्रेक्षकांना खूप भावलं होतं. ते म्हणजे विवेक मशरु होय.पण तो आता दुसऱ्या सीझनमध्ये दिसत नाही.
4 / 8
विवेकने सीआयडीमध्ये इन्स्पेक्टर विवेक नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. तो शोच्या मुख्य टीमचा भाग होता.
5 / 8
विवेक मशरूने २००६ मध्ये 'सीआयडी मालिकेत एन्ट्री घेतली . त्यानंतर जवळपास ६ वर्षानंतर त्याने अचानक मालिका सोडली.
6 / 8
सीआयडीमधील विवेक मशरु हा त्या काळी अनेक तरुणींचा क्रश झाला होता.
7 / 8
विवेक मशरुने 'अक्कड बक्कड बम्बे बो 'या मालिकेतून त्याच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर तो सीआयडीमध्ये झळकला.
8 / 8
विवेकने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. त्यानंतर तो काही काळ हिमालयात देखील राहिला. त्याच्या लिक्डींन प्रोफाईलनूसार, विवेक २०१३ मध्ये बेंगळुरूस्थित विवेक अव्हेन्यूजचे ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून पदभार सांभाळला.याशिवाय त्याने अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिल्याच्याही चर्चा होत्या.
टॅग्स :सीआयडीटेलिव्हिजनसेलिब्रिटी