PHOTOS : ‘हेराफेरी’तील रिंकू आठवते? आता अशी दिसते देवीप्रसादची नात, पाहाल तर पाहातच राहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 10:20 IST
1 / 10‘हेराफेरी’ हा सिनेमा रिलीज होऊन 20 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. पण आजही या सिनेमातील प्रत्येक पात्र लोकांच्या मनात जिवंत आहे. अक्षय कुमार,तब्बू, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमातील एक चिमुकला चेहराही तुम्हाला आठवत असेलच. होय, देवीप्रसादची नात रिंकू.2 / 10या रिंकूचे अपहरण होते. कबीरा तिला किडनॅप करतो आणि रिंकू हवी असेल तर पैशाची मागणी करत देवीप्रसादला फोन करतो. पण फोन लागतो बाबूरावला आणि इथूनच सुरु होते हेराफेरी.3 / 10सिनेमात रिंकूची भूमिका साकारणा-या चिमुकलीचे नाव होते एलेक्सिया एनरा. ही एलेक्सिया आता बरीच मोठी झाली आहे.4 / 10एलेक्सिया एक एंटरप्रेन्योर व इन्व्हायमेंटल कन्सल्टंट आहे.5 / 10हेराफेरीमधील ही चिमुकली आता चांगलीच ग्लॅमरस व हॉट दिसते.6 / 103 वर्षांची असतानापासून एलेक्सिया मॉडेलिंग करतेय. पण सिनेमातील तिचा प्रवास थांबलाय.7 / 10एलेक्सियाने सिनेमे करू नयेत, अशी आईवडिलांची इच्छा होती. मॉडेलिंग आणि जाहिरातीसाठी त्यांचा होकार होता. पण मुलीने सिनेमात काम करण्यास त्यांचा विरोध होता.8 / 10हेराफेरी या सिनेमातही केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीत शूट होते म्हणून मम्मीपापाने एलेक्सियाला काम करण्याची परवानगी दिली गेली होती. 9 / 10‘अवई शानमुगी’या तमिळ चित्रपटात एलेक्सियााने कमल हसन यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.10 / 10 ‘हेरा फेरी’ या चित्रपटानंतर एलेक्सिया एका ही चित्रपटात काम नाही केले.