Join us

विराट अनुष्काच्या लग्नातील 'पीर वी तू' गाण्यामागची गोष्ट काय? गायिका हर्षदीप कौरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 17:13 IST

1 / 8
विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हे अनेकांचं लाडकं कपल. दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. दोघांचेही अपडेट जाणून घ्यायची चाहत्यांना उत्सुकता असते.
2 / 8
सध्या विराट आणि अनुष्का परदेशातच असतात. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांसाठी अनुष्काही विराटसोबत होती. तर इतर वेळी हे कपल आपल्या दोन्ही मुलांसह लंडनमध्येच स्थायिक झालेलं पाहायला मिळत आहे.
3 / 8
२०१७ मध्ये विराट आणि अनुष्का इटली येथे लग्नबंधनात अडकले. यानंतर एक वर्षाने त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा वेडिंग व्हिडिओ रिलीज झाला.
4 / 8
विरुष्काच्या लग्नाचा व्हिडिओ आजही सगळ्यांच्या आवडीचा आहे. गुलाबी लेहेंग्यात अनुष्काची एन्ट्री, मंडपात असलेल्या विराटने तिच्याकडे कौतुकाने पाहणं हे सगळंच खूप गोड होतं.
5 / 8
या व्हिडिओसाठी गायिका हर्षदीप कौरने (Harshdeep Kaur) खास गाणं गायलं होतं.'पीर वी तू' असं ते गाणं होतं जे अनेकांना माहित असेल. हे गाणं बनवण्याआधी तिला विराट अनुष्का बद्दल नक्की काय सांगण्यात आलं होतं याचा खुलासा तिने नुकताच केला.
6 / 8
द म्युझिक पॉडकास्टमध्ये गायिका हर्षदीप कौर म्हणाली, 'मी या वेडिंग साँगचा भाग होते. त्यांच्या अॅनिव्हर्सीवर हे गाणं रिलीज झालं. हे एक लव्ह साँग आहे असं मला सांगण्यात आलं होतं.
7 / 8
विराट आणि अनुष्काला एकमेकांसाठी जे वाटतं ते गाण्याचे बोल आहेत. त्यांना एकमेकांमध्ये देवच दिसतो. बस हाच फील हवा असं दिग्दर्शक विशाल पंजाबी म्हणाले होते. या शब्दात शांततेत ऐक आणि गा.'
8 / 8
११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्का-विराट लग्नबंधनात अडकले. त्यांना वामिका ही मुलगी आणि आता अकाय हा मुलगाही आहे.
टॅग्स :संगीतविराट अनुष्का लग्नविराट कोहलीअनुष्का शर्माबॉलिवूडलग्न