Join us

Happy Birthday Sunil Grover : अनेक शोमधून सुनील ग्रोवरला करण्यात आलं होतं रिप्लेस, त्याचा प्रवास वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 12:11 IST

1 / 8
गत्त्थी असो वा डॉक्टर गुलाटी या भूमिका करून कॉमेडियन सुनील ग्रोवर हा गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आपल्या टॅलेन्टच्या जोरावर आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर सुनीलने इंडस्ट्रीत आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. आज याच सुनील ग्रोवरचा वाढदिवस. चला जाणून त्याच्याबाबतच्या काही खास गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील. (Image Credit : rvcj.com)
2 / 8
आज जगाला हसवणारा सुनील ग्रोवर कधी काळी खूप रडला होता. कारण त्याला मिळालेली ही ओळख अशीच मिळाली नाही. त्यासाठी त्याला खूप स्ट्रगल करावा लागला. मोठ्या संघर्षानंतर त्याला हे यश मिळालं. सुरूवातीला त्याला अनेक शोमधून काढण्यात आलं होतं. (Image Credit : peepingmoon.com)
3 / 8
सुनीलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी त्यांच्या जीवनात मोठा संघर्ष केला. त्याने सांगितले होते की, तो मुंबईत आला होता तेव्हा तो एका पॉश परिसरात राहत होता. कारण त्याला घरातील काही पैसे मिळाले होते. तो खूप पार्ट्या करायचा.
4 / 8
पण एक वेळ अशीही होती की, सुनील महिन्याला केवळ ५०० रूपये कमावत होता. हळूहळू त्याची सेव्हिंगही संपली होती. तेव्हा सुनीलला जाणीव झाली की, त्याला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागेल.
5 / 8
एका शोमध्ये त्याला काम करण्याची संधी मिळाली होती. पण त्याला काही दिवसच काम मिळालं. नंतर त्याला रिप्लेस करण्यात आलं.
6 / 8
अशात पैसे मिळवण्यासाठी सुनील आरजे म्हणून काम सुरू केलं. त्याने आरजे सुदर्शन नावाने खूप लोकप्रियता मिळवली होती. इथे तो व्हाइस ओव्हरचं काम करत होता. काही वर्ष त्याने रेडिओवरच काम केलं. यात त्याला यशही मिळालं.
7 / 8
त्यानंतर सुनीलच्या करिअरमध्ये टर्निंग पॉइंट आला. त्याने आधी कॉमेडी नाइट विथ कपिल आणि नंतर द कपिल शर्मा शोमध्ये काम केलं. त्याच्या गुत्थी आणि डॉक्टर गुलाटी या भूमिका फेमस झाल्या. त्या लोकप्रियतेची तो स्वप्ने बघत होता ते त्याला मिळत होतं.
8 / 8
पण यादरम्यान सुनील आणि कपिलमध्ये एक वाद झाला. त्यामुळे त्याने कपिलचा सोडला. त्यानंतर तो सलमान खानच्या भारत सिनेमात दिसला होता. नंतर त्याचा एक शो सुद्धा आला होता. आज तो एक स्टार कॉमेडियन आहे.
टॅग्स :सुनील ग्रोव्हरटेलिव्हिजनसेलिब्रिटी