बिग बॉस फेम गौहर खानच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री, १२ वर्षाने लहान मुलाला डेट करत असल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 13:56 IST
1 / 12बिग बॉस ७ ची विजेती गौहर खानच्या लव्ह लाइफबाबत नवीन अपडेट समोर आलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौहर खानच्या आयुष्यात एक व्यक्ती एन्ट्री झालीये. चर्चा आहे की, गौहर खान म्युझिक कंपोजर इस्माइल दरबारचा मुलगा जैदला डेट करत आहे.2 / 12ई टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गौहर खान जैदला सीक्रेटली डेट करत आहे. अशीही माहिती आहे की, दोघेही बराच वेळ सोबत घालवतात. आश्चर्याची बाब म्हणजे जैद गौहर खानपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे.3 / 12दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर जैद आणि गौहर खानचे एकत्र असलेले फोटो व्हायरल झाले आहेत.4 / 12जैद आणि गौहर खानचा एक डान्स व्हिडीओही समोर आला आहे. हे तर सर्वांनाच माहीत आहे की, दोघांमध्ये चांगला बॉन्ड आहे. पण दोघे रिलेशनमध्ये असल्याची चर्चा किती खरी आहे हे ठोसपणे कुणालाही माहीत नाही.5 / 12जैद हा अभिनेता, इफ्लूएंसर, कंटेट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत. तो एक प्रोफेशनल डान्सरही आहे.6 / 12तो म्युझिक व्हिडीओ छमियामध्ये शक्ती मोहन आणि वेस्ट इंडीजचा क्रिेकेटर ड्वेन ब्राओसोबत दिसला होता. हे गाणं चांगलंच गाजलं होतं.7 / 12काही दिवसांपूर्वीच जैदने गौहर खानसोबतचा सेल्फी शेअर केला होता. याला त्याने कॅप्शन दिलं होतं की, Her soul is pure magic.8 / 12जैदआधी गौहर खानचं नाव टीव्ही अभिनेता कुशल टंडनसोबत जुळलं होतं. दोघांचं हे नातं बिग बॉसच्या घरात सुरू झालं होतं. दोघांचा सोबत एक म्युझिक व्हिडीओ सुद्धा होता. नंतर त्याचं ब्रेकअप झालं होतं.9 / 12दोघांचं ब्रेकअप झालं तेव्हा दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. पण आता दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे निघाले आहेत. जुन्या गोष्टी त्यांनी मागे सोडल्या आहेत.10 / 12आता दोघांमध्ये काही वाद नाहीत. दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंटही करतात. गौहर खान शेवटची २०१८ मध्ये आलेल्या बेगम जान सिनेमात दिसली होती.11 / 1212 / 12