By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:27 IST
1 / 8Ameesha Patel Hot Bold Photos: सनी देओलचा गदर हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनी सनी देओलने Gadar 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला.2 / 8या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पहिल्या भागात अमिषा पटेल ही पाकिस्तानात भारतात आल्याचे दाखवले होते. तेच कथानक पुढे सुरु ठेवत याभागात ती अतिशय साधीभोळी, सोज्वळ अशी गृहिणीची भूमिका साकारताना दिसली.3 / 8अमिषा पटेल खऱ्या आयुष्यात प्रचंड फॅशन फ्रीक अन् बिनधास्त अशा पद्धतीची असली तरी गदर चित्रपटातील सोज्वळ 'सकीना'चे पात्र तिने उत्तम रेखाटले. पण सध्या अमिषा पटेलचे एक बोल्ड फोटोशूट तुफान चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.4 / 8अमिषा पटेलने नुकतेच एक भलतेच बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यात तिने काळ्या रंगाची टू पीस बिकीनी घातली असून ती एका स्विमिंग पूलच्या किनारी बसली आहे.5 / 8अमिषा पटेलची बोल्ड फोटोशूट करण्याची ही पहिली वेळ नाही. मधल्या काळात जेव्हा ती बॉलिवूड चित्रपटांमध्ये फारशी दिसत नव्हती तेव्हा ती तिच्या बोल्ड अँड बिनधास्त फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असायची.6 / 8अमिषाने गदरमध्ये एका २० वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका योग्य प्रकारे पेलली. त्या भूमिकेमध्ये कुठेही तिच्या वैयक्तिक आयुष्यातील बिनधास्तपणा दिसून आला नाही. त्यात एक अतिशय सालस आई आणि गृहिणीची भूमिका तिने चोख बजावली.7 / 8मात्र आता नव्या दमाच्या युवा अभिनेत्री मोठ्या संख्येने फिल्म इंडस्ट्रीत येत आहेत आणि आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. त्यामुळे स्पर्धेची गणिते पाहता तिने सोशल मीडियावरील आपला बोल्ड अंदाज कायम ठेवल्याचे दिसत आहे.8 / 8आजच तिने पोस्ट केलेल्या फोटोशूटमध्ये तिने टू पीस बिकीनी घातली असून काळ्या रंगाचा गॉगल घातला आला. तिने केलेला पेहराव 'रिव्हिलिंग' आहे. परंतु तरीही तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून मोठ्या संख्येने लाइक्स अन् कमेंट्स मिळताना दिसत आहेत.