By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 08:00 IST
1 / 10सध्या सोशल मीडियावर 'बंटी और बबली 2' या आगामी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. 2 / 10'बंटी और बबली' या चित्रपटाचा हा सिक्वल असून यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.3 / 10मनोहर जोशी यांच्या नातीचं नाव शर्वरी वाघ असं असून 'बंटी और बबली 2' या चित्रपटात ती बबलीची भूमिका साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाला असून शर्वरीच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.4 / 10शर्वरी तिच्या अभिनयासोबतच ग्लॅमरस फोटोमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर सक्रीय असलेली शर्वरी अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.5 / 10शर्वरी ही मनोहर जोशी यांची नात असून शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे. 6 / 10१४ जून १९९६ मध्ये मुंबईत जन्म झालेल्या शर्वरीने दादर येथील पारसी यूथ अॅसेम्बलीमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमधून पदवी घेतली. 7 / 10शर्वरीने १६ व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये कॉलेजमध्ये असताना तिने क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. 8 / 10शर्वरीने जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओमधून अभिनयाचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. तसंच बॉलिवूडमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. 9 / 10प्यार का पंचनामा २, बाजीराव मस्तानी, सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमांसाठी शर्वरीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 10 / 10बंटी और बबली पूर्वी शर्वरीने 'द फरगॉटन आर्मी' या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यामुळे शर्वरी वाघ हे नाव आता सर्वपरिचित झालं आहे.