Join us  

इंडस्ट्रीपासून दूर झालेल्या ईशाचा इन्कम सोर्स काय? कसा करणार लेकींचा सांभाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 2:11 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल हिने नुकताच पती भरत तख्तानी याच्यासोबत काडीमोड घेतला आहे.
2 / 10
जवळपास १२ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर ही जोडी विभक्त झाली आहे. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर संसार थाटणाऱ्या या जोडीने घटस्फोट घेतल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
3 / 10
भरतपासून विभक्त झाल्यानंतर ईशाने तिच्या दोन्ही लेकींची जबाबदारी स्वीकारली आहे.
4 / 10
गेल्या काळात ईशा कोणत्याही सिनेमात झळकली नाही. लग्नानंतर तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. त्यामुळे आता तिचा इन्कम सोर्स काय हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
5 / 10
दोन मुलींची जबाबदारी स्वीकारलेली ईशा कोणता बिझनेस वा व्यवसाय करते?, पैसे कमावण्याचं तिचं साधन कोणतं? असे कितीतरी प्रश्न नेटकरी विचारत आहेत. त्यामुळेच तिचं इन्कम सोर्स काय ते जाणून घेऊयात.
6 / 10
भरतसोबत विभक्त झाल्यानंतर ईशाला ठराविक रक्कम पोटगी म्हणून मिळणार आहे. सोबतच तिचा कलाविश्वातील वावर जरी कमी झाला असला तरी सुद्धा ती अनेक जाहिरातींमध्ये काम करते.
7 / 10
आज ईशा १५ कोटींपेक्षा जास्त संपत्तीची मालकीन असल्याचं सांगण्यात येतं.
8 / 10
‘कोई मेरे दिल से पूछे’ या बॉलिवूड सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती अनेक सिनेमात झळकली. मात्र, ते फ्लॉप ठरले.
9 / 10
ईशाने आतापर्यंत ‘धूम’, ‘ना तुम जानो ना तुम’, ‘इंसान’, ‘नो एंट्री’, ‘प्यारे मोहन’, ‘युवा’, ‘कुछ तो है’, ‘दस और आंखे’ सारखे काही सिनेमे हिट झाले.
10 / 10
लग्न झाल्यानंतर मात्र ती बॉलिवूडपासून दुरावली. मात्र, आता घटस्फोटानंतर ती पुन्हा कलाविश्वात कमबॅक करते की काय अशी नवीन चर्चा सुरु झाली आहे.
टॅग्स :इशा देओलबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा