Join us

मराठी दिग्दर्शकाची पत्नी, सौंदर्यात भल्याभल्या अभिनेत्रींना देते मात; तिच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:13 IST

1 / 8
बॉलिवूडमध्ये नेहमीच अनेक सुंदरींची चर्चा असते. अशा काही अभिनेत्री आहेत ज्या सौंदर्यामुळे अनेकांना मात देतात.
2 / 8
अशीच एक अभिनेत्री जी प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्मात्याची पत्नी आहे. दृश्यम २ चे दिग्दर्शक अभिषेक पाठक (Abhishek Pathak) यांची पत्नी शिवालिका ओबेरॉय (Shivaleeka Oberoi) अभिनेत्री आहे.
3 / 8
शिवालिकाच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. तिच्या सौंदर्याने, फिटनेसने आणि हॉटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे.
4 / 8
चाहत्यांनी शिवालिकाच्या बिकिनी फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. सनी लिओनीलाही टक्कर देणारे तिचे हे फोटो असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
5 / 8
तिने शेअर केलेले हे बीच फोटोज लक्ष वेधून घेत आहेत. नो मेकअप लूकमध्येही ती कमालीची सुंदर दिसते अशाही कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत
6 / 8
शिवालिकाने अभिषेकसोबतही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. दोघांची जोडी खूपच गोड दिसत आहे.
7 / 8
२०२३ साली अभिषेक आणि शिवालिका लग्नबंधनात अडकले. २०२० साली शिवालिकाने 'खुदा हाफिज'सिनेमात काम केले होते. या सिनेमाची निर्मिती अभिषेकनेच केली होती.
8 / 8
अभिषेक पाठक पॅनोरमा स्टुडिओजचे संस्थापक कुमार मंगत पाठक यांचा मुलगा आहे. अभिषेकनेही पॅनोरमा स्टुडिओ अंतर्गत मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे. यामध्ये मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा नुकताच रिलीज झालेला 'फुलवंती'ही आहे. तसंच 'घरत गणपती' सिनेमाही त्यांनीच निर्मित केला आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडमराठी चित्रपट