Join us

Deepika Padukone : "रडू लागले, जगण्याची इच्छाच संपली..."; दीपिका पादुकोण कशी पडली डिप्रेशनमधून बाहेर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:21 IST

1 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आता या लोकप्रिय कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण दिसली.
2 / 11
दीपिकाने तिच्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधला. तिने डिप्रेशनचा कसा सामना केला याबाबत सांगितलं आहे.
3 / 11
शाळेतील दिवस आठवताना दीपिका म्हणते की, 'मी अनेक गोष्टींमध्ये सहभागी होते. शाळा, खेळ आणि मग मॉडेलिंग. २०१४ मध्ये एके दिवशी, मी अचानक बेशुद्ध पडले आणि काही दिवसांनी मला जाणवलं की मी डिप्रेशनमध्ये आहे.'
4 / 11
'आपण डिप्रेशनमध्ये असतो पण आपल्याला ते लवकर कळत नाही. मीही आधी कोणालाही सांगितलं नव्हतं. मी मुंबईत एकटीच राहत होते, पण हे कोणाशीही शेअर केलं नाही.'
5 / 11
'जेव्हा माझी आई मुंबईत आली आणि काही दिवसांनी परत गेली तेव्हा मी अचानक रडू लागले. मी पूर्णपणे निराश झाले, माझी जगण्याची इच्छाच संपली होती.'
6 / 11
'मी नंतर एका सायकोलॉजिस्टला फोन केला आणि जेव्हा मी याबद्दल मोकळेपणाने बोलले तेव्हा मला खूप हलकं वाटलं. बरेच लोक विचार करतात की डिप्रेशन कसं येऊ शकतं? मलाही असंच वाटायचं, पण सत्य हे आहे की डिप्रेशन कोणालाही येऊ शकतं.'
7 / 11
'या अनुभवानंतर, मानसिक आरोग्याबाबत जागरूकतेचा माझा प्रवास सुरू झाला आणि मला जाणवलं की, याचं योग्य निराकरण केवळ संभाषण आणि समजुतीनेच शक्य आहे.'
8 / 11
विद्यार्थ्यांना सल्ला देताना अभिनेत्रीने सांगितलं की, 'मानसिक आरोग्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप आणि सूर्यप्रकाश.'
9 / 11
'तुमच्या भावना शेअर करण्यास कधीही संकोच करू नका. लोकांनी ऐकावं आणि पाहावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे, बोलण्यास घाबरू नका.'
10 / 11
'तुमचे विचार शेअर करून तुम्ही तुमच्या चिंता कमी करू शकता आणि यामुळे तुम्हाला खूप बरं वाटू शकतं' असं देखील दीपिकाने म्हटलं आहे.
11 / 11
टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड