Join us

Deepika Padukone : दीपिका पादुकोण लेक दुआबद्दल गुगलवर सर्वात जास्त काय करते सर्च? अभिनेत्रीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 12:05 IST

1 / 9
दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. दमदार अभिनय कौशल्य सिद्ध केलं आहे. गेल्या वर्षी दीपिका एका गोंडस मुलीची, दुआची आई झाली.
2 / 9
अभिनेत्री चित्रपटांपासून दूर पालकत्वाचा आनंद घेत आहे. दीपिका तिच्या मुलीला मीडियापासून दूर ठेवायला आवडतं. या सगळ्यामध्ये अभिनेत्रीने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला आहे की, ती मुलगी दुआशी संबंधित कोणते प्रश्न गुगलवर सर्च करते.
3 / 9
इतर अनेक बॉलिवूड जोडप्यांप्रमाणे, दीपिका पादुकोणनेही तिची मुलगी दुआला मीडियाच्या प्रसिद्धीपासून दूर ठेवणं पसंत केलं आहे. तिने तिच्या चाहत्यांना तिच्या मुलीचा चेहरा दाखवलेला नाही, किंवा ती तिच्याबद्दल जास्त बोलत नाही.
4 / 9
दीपिकाने अबू धाबी येथे झालेल्या फोर्ब्स समिटमध्ये सहभागी झाली होती. या संभाषणादरम्यान, तिला विचारण्यात आलं की तिने गुगलवर किंवा ऑनलाइन शोधलेली शेवटची गोष्ट कोणती होती.
5 / 9
अभिनेत्रीने खुलासा केला की, तिने सर्च केलेली शेवटची गोष्ट 'माझं बाळ थुंकणं कधी थांबवेल? किंवा असंच काहीतरी.'
6 / 9
त्या प्रश्नाव्यतिरिक्त, दीपिकाला विचारण्यात आलं की तिच्यासाठी सुट्टीचा अर्थ काय आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना, अभिनेत्रीने सांगितलं की तिचा दिवस तिच्या घरामध्ये काही रिलॅक्सिंग एक्टिव्हिटीज आणि तिची मुलगी दुआसोबत वेळ घालवण्यात जातो.
7 / 9
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'झोप, मालिश, हायड्रेट, बेबी टाईम आणि मुळात घरी माझ्या पायजम्यात अंथरुणावर लोळणं.'
8 / 9
दीपिका पादुकोण आणि तिचा पती रणवीर सिंग यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली. हे कपल सप्टेंबर २०२४ मध्ये पालक झाले.
9 / 9
दिवाळीच्या निमित्ताने दीपिका आणि रणवीरने त्यांच्या मुलीचं नाव तिच्या पावलांच्या फोटोसह जाहीर केलं होतं आणि सांगितलं की, त्यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव दुआ ठेवलं आहे.
टॅग्स :दीपिका पादुकोणबॉलिवूड