1 / 8कान्स फिल्म फेस्टिवलमधील बॉलिवूड अभिनेत्रींच्या रेड कार्पेट लुकची सध्या चांगलीच चर्चा होतेय. दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, हिना खान या बॉलिवूडच्या ललना एकापेक्षा एक स्टनिंग लुक्समध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरल्या. 2 / 8अर्थात या ललनांला लुक्सवरून ट्रोल करणारेही आहेत. बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण कान्सच्या तिसऱ्या दिवशी रेड कलरच्या ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर उतरली आणि ट्रोल झाली.3 / 8दीपिकाने कान्स सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी Louis Vuitton ने डिझाईन केलेला रेड गाऊन घातला होता. या स्कारलेट गाऊनमध्ये दीपिका कमालीची सुंदर दिसत होती. Cartier नेकलेस आणि क्लासिक मेकअप व हेअरडो असा तिचा लुक होता.4 / 8डिप नेकलाईन गाऊनसोबत रेड लिपस्टिक, पिंक हायलाईटर, ग्लोइंग मेकअप अशा तिच्या लुकमध्ये हेअरडोला सर्वाधिक हायलाईट करण्यात आलं होतं. पण तिची मैसी हेअरस्टाईल अनेकांना आवडली नाही. मग काय अनेक सोशल मीडिया युजर्सनी तिला यावरून ट्रोल केलं.5 / 8अनेकांना ना दीपिकाचा रेड गाऊन आवडला, ना मेकअप आणि ना हेअर स्टाईल आवडली. तिला तिच्या हेअरस्टाईलवरून सर्वाधिक ट्रोल केलं गेलं.6 / 8हिचे केस बघा, जणू झोपेतून उठून आलीये. ही काय हेअरस्टाईल आहे, अशा कमेंट्स लोकांनी दिल्या. काहींनी तिच्या या लुकला ‘अॅव्हरेज’ म्हणत तिची खिल्ली उडवली.7 / 8कान्स सोहळ्याच्या पहिल्या दिवशी दीपिका ब्लॅक-गोल्ड कलरच्या साडीत रेड कार्पेटवर उतरली होती. तिच्या या लुकवरही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काहींनी तिच्या देशी लुकचं कौतुक केलं होतं, तर काहींनी तिला ट्रोल केलं होते.8 / 8 दीपिकाने यंदा कान्स फेस्टिवलच्या ज्युरी टीमचा भाग आहे. ही फक्त दीपिकासाठीच नाही तर भारतासाठीही अभिमानाची गोष्ट आहे.