By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 19:38 IST
1 / 6 Dhanashree Verma Yuzvendra Chahal wife Christmas celebration : टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहल यांची पत्नी धनश्री वर्मा सतत तिच्या डान्स किंवा बोल्ड फॅशन स्टाइलमुळे चर्चेत असते.2 / 6धनश्री ही युजवेंद्र चहलशी लग्न झाल्यानंतर जास्त लोकप्रिय झाली हे खरं असलं तरी ती एक उत्तम डान्सर आणि फिटनेस फ्रीक आहे हे तितकंच खरं आहे.3 / 6एखादा सण-उत्सव असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादी घटना असो, धनश्री आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच याबाबत सक्रिय असते.4 / 6डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून साऱ्यांनाच नाताळ आणि नववर्षाचे वेध लागतात. धनश्री देखील ख्रिसमस सेलिब्रेशन करताना दिसली. याबद्दलचे फोटो तिने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 5 / 6फोटोशूटमध्ये धनश्रीने सुंदर असा पांढऱ्या रंगाचा फ्लोरल वन पीस घातला असून त्यावर छानशी सांताक्लॉझ हॅट घातली आहे. धनश्रीचे सुंदर हास्य या पेहरावावर अधिकच खुलून दिसत आहे. 6 / 6धनश्रीने आपल्या घरात नाताळ विशेष अशी ख्रिसमस ट्री सजवली आहे. त्यासोबतच तिने त्या ख्रिसमस ट्री वर छान छोटी छोटी गिफ्ट लावली असून त्यासोबत फोटोशूट केलं आहे.