प्रसाद ओकच्या नवीन घराच्या भिंतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय लिहिलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 18:10 IST
1 / 9प्रसाद ओक हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. सिनेमा आणि नाटकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारा प्रसाद उत्तम नट असण्याबरोबरच दिग्दर्शकही आहे. 2 / 9 प्रसादने नवं घर घेत नववर्षाच्या सुरुवात गोड केली होती.सोशल मीडियावर त्याने नव्या घराचे फोटोही शेअर केले होते. 3 / 9प्रसाद ओकच्या या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेट दिली. याचे फोटो शेअर करत प्रसादने खास पोस्ट लिहिली आहे. 4 / 9'मुख्यमंत्री साहेब…!!! माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून, तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तूशांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात.' 5 / 9'अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात...'6 / 9'नीट निरखून आख्खं घर पाहिलंत...हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे.'7 / 9'आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीने “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!!' असं प्रसादने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 8 / 9प्रसाद ओकच्या घराच्या भींतीवर एकनाथ शिंदेंनी खास संदेशही लिहिला आहे. प्रसादच्या घरातील भींतीवर 'हार्दिक शुभेच्छा' असं लिहित मुख्यमंत्र्यांनी त्याखाली स्वाक्षरीही केली.9 / 9त्याचबरोबर त्यांनी प्रसाद ओकच्या घराला भेट दिल्याची तारीख 6|1|2024 देखील मेसेजच्या खाली भिंतीवर लिहिली आहे.