CID फेम फ्रेडरिकच्या कुटुंबावर पसरली शोककळा, १५ दिवसांपूर्वीच केला होता लग्नाचा वाढदिवस साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:19 IST
1 / 9CID मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा फ्रेडरिक आज आपल्यात नाही. अभिनेते दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचं निधन झालं असून मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली आहे. सीआयडी मालिकेत आरोपीचा शोध लावता लावता प्रेक्षकांना हसवण्याचंही काम त्यांनी केलं. 2 / 9दिनेश फडणीस यांचा जन्म बिहारमध्ये झाला. त्यांनी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते मुंबईत आले. इथे त्यांचा स्ट्रगल सुरु झाला. त्यांना कामं मिळत नव्हती.3 / 9१९९८ मध्ये त्यांची भेट CID चे निर्माते बीपी सिंह यांच्याशी झाली आणि त्यांनी कामासाठी विचारणा केली. तेव्हा त्यांनी CID ला लगेच होकार दिला.4 / 9अभिनयात पदार्पण करण्यापूर्वीच दिनेश फडणीस यांचं लग्न झालं होतं. दिनेश यांना सीआयडीत भूमिका मिळाल्यानंतर त्यांचं कुटुंब खूप खूश होतं.5 / 9 त्यांच्या पत्नीचं नाव नैना आहे. 15 दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता.6 / 9काही दिवसांपूर्वीच दिनेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अन्य आजारामुळे त्यांचं लिव्हर डॅमेज झालं होतं.दोन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोणी विचारही केला नव्हता की १५ दिवसांपूर्वी त्यांनी साजरा केलेला लग्नाचा वाढदिवस शेवटचा ठरेल.7 / 9दिनेश यांचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. पत्नीसोबतचे अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. सर्वांसोबत त्यांनी दिवाळी उत्साहात साजरी केली. 8 / 99 / 9सीआयडी मालिकेतील सर्व कलाकारांसोबत त्यांचं कुटुंबाप्रमाणेच नातं होतं. १९९८ ते २०१८ पर्यंत २० वर्ष ते या शोचा भाग राहिले.