'शोले'तील सांबाच्या लेकी आहेत प्रचंड ग्लॅमरस; सौंदर्याच्या बाबतीत करतायेत मोठमोठ्या अभिनेत्रींवर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 13:36 IST
1 / 11७० च्या दशकात तुफान लोकप्रिय झालेला चित्रपट म्हणजे 'शोले'. उत्तम कथानक आणि त्याला साजेशा कलाकारांनी केलेला अभिनय यामुळे हा चित्रपट आज अजरामर झाला आहे.2 / 11ठाकूर, जय-वीरु, बसंती आणि गब्बर यांच्यासह या चित्रपटातील एक भूमिका गाजली ती म्हणजे सांबाची. 'अरे ओ सांबा कितने आदमी थे' हा डायलॉग ऐकल्यानंतर सांबाने जी रिअॅक्शन दिली होती. ती विशेष लोकप्रिय झाली होती.3 / 11या चित्रपटात अभिनेता मॅक मोहन यांनी सांबाची भूमिका साकारली होती. परंतु, ही भूमिका लोकप्रिय करणारा हा अभिनेता आज आपल्यात नाही. १० मे २०१० रोजी त्यांचं निधन झालं.4 / 11मॅक मोहन यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र, त्यांच्याविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. त्यामुळेच मॅक मोहन यांच्या लेकींविषयी आज जाणून घेऊयात. 5 / 11मॅक मोहन यांना दोन लेकी असून विनती मकिजानी (Vinati Makijany) आणि मंजरी मकिजानी (Manjari Makijany) अशी त्यांची नावं आहेत.6 / 11विनती आणि मंजरी या दोघी त्यांच्या वडिलांप्रमाणे कलाविश्वात कार्यरत आहेत. तसंच मॅक याचा लेक विक्रांत मकिजानीदेखील कलाविश्वात सक्रीय असल्याचं सांगण्यात येतं.7 / 11मॅक मोहनची मोठी मुलगी मंजरी एक फिल्म प्रोड्यूसर असून तिने अनेक शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत.8 / 11२०१२ मधील 'द लास्ट मार्बल' आणि २०१४ मधील 'द कॉर्नर टेबल'साठी तिचं विशेष कौतुक करण्यात आलं.9 / 11मंजरीने 'डंर्किक', 'द डार्क नाइट राइसेस', 'वंडर वुम'न आणि 'मिशन इम्पॉसिबल' अशा चित्रपटांमध्ये असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे.10 / 11मंजरीने प्रियांका चोप्राच्या चित्रपटात ‘सात खून माफ’ आणि रणबीर कपूरच्या ‘वेक अप सिड’ चित्रपटात काम केले आहे. 11 / 11मोठी बहीण मांजरीप्रमाणेच लहान बहीण विनतीसुद्धा प्रोड्यूसर आणि अभिनेत्री आहे. तिने शाहरुख खानच्या २०१० मध्ये आलेल्या ‘माय नेम इज खान, स्केट बस्ती आणि ‘स्केटर गर्ल’ या चित्रपटात काम केले आहे.