डॉक्टरकी सोडून अभिनयाकडे वळला! 'लालबाग परळ'मध्ये झळकला अन् 'छावा' गाजवला, ओळखलंत या अभिनेत्याला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 17:19 IST
1 / 7सध्या 'छावा' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. आज १४ फेब्रुवारीला 'छावा' सिनेमा जगभरातील थिएटर्समध्ये रिलीज झालाय2 / 7'छावा'मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. विकीसोबत सिनेमातील आणखी एका अभिनेत्याची चर्चा आहे.3 / 7तुम्हाला मराठीतील 'लालबाग परळ' सिनेमा आठवत असेलच. या सिनेमात मोहनच्या भूमिकेत झळकलेला अभिनेत्याचं 'छावा'मधील भूमिकेमुळे कौतुक होतंय.4 / 7या अभिनेत्याचं नाव आहे विनीत कुमार सिंग. 'छावा' सिनेमात विनीतने छंदोगामात्य कवी कलश यांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.5 / 7 'छावा' गाजवणारा विनीत कुमार सिंग हा अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे. 'गँग्ज ऑफ वासेपूर', 'गँग्ज ऑफ वासेपूर २', 'मुक्काबाज' अशा सिनेमांमधून विनीत कुमार झळकला. 6 / 7विनीत कुमार सिंगच्या पत्नीचं नाव रुचिरा आहे. रुचिरा सुद्धा अभिनेत्री आहे. रुचिराने 'ह्यूमन' आणि 'she 2' यांसारख्या वेबसीरिजमध्ये काम केलंय7 / 7विनीत कुमार सिंगबद्दल सांगायचं तर तो 'छावा'नंतर तो आपल्याला 'सुपरबॉईज ऑफ मालेगाव' या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे. बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेता म्हणून विनीतची ओळख आहे.