celebrity Indian Citizen : भारतीय सेलिब्रिटी पण 'भारतीय नागरिकत्व'च नाही..कोण आहेत असे स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 13:48 IST
1 / 6बॉलिवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे. सध्या ती मुंबईतच स्थायिक असून बॉलिवुडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. तरी तिला अनेकदा श्रीलंकन गर्ल म्हणूनच चिडवले जाते.2 / 6कॅटरिना कैफचा जन्म हा हॉंगकॉंगमध्ये झाला तर ती लंडनमध्ये लहानाची मोठी झाली. कॅटरिना चे वडील काश्मीरी असून आई ब्रिटिश आहे. तर कॅटरिनाकडे हॉंगकॉंगचे नागरिकत्व आहे. सध्या कॅटरिना बॉलिवुडची टॉपची अभिनेत्री आहे. नुकतेच ती अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकली आहे.3 / 6खुप कमी जणांना माहित असेल पण कपुर घराण्याची सून आलिया भट कपुर हिच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. तिची आई सोनी राजदान ही मूळची ब्रिटीश आहे. मी ब्रिटीश असल्याने मला मतदान करता येत नाही असे तिने एकदा सांगितले होते. 4 / 6सनी लिओनी मुळची कॅनडियन असून तिच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. मात्र सध्या सनी मुंबईत आहे आणि बॉलिवुडमध्ये आपले करिअर बनवत आहे. तर सनी चा पती डॅनियल वेबर अमेरिकन आहे.5 / 6डान्सर, मॉडेल नोरा फतेही देखील कॅनडियन आहे. तिच्याकडे कॅनडा देशाचे नागरिकत्व आहे. नोरा सध्या रिअॅलिटी शो, हिंदी सिनेमांमध्ये आपले नशीब आजमावत आहे. तर ती मुळात उत्कृष्ट डान्सर आहे. 6 / 6अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे हे आता सर्वांनाच माहित आहे. अक्षय कुमारने कधीही भारताशी संबंधित गोष्टींवरुन प्रतिक्रिया दिली तर त्याला लगेच कॅनडियन म्हणून ट्रोल केले जाते.