"घराबाहेर जायला भीती वाटायची"; कतरिना कैफमुळे 'या' अभिनेत्रीला आला खूपच वाईट अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 12:36 IST
1 / 9बॉलिवूडमधील भाईजान म्हणजेच सलमान खानसोबत २०१० मध्ये वीर या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जरीन खानने पदार्पण केलं. जरीन खानच्या सौंदर्याने पहिल्यांदाच लोक इतके प्रभावित झाले की तिची तुलना अभिनेत्री कतरिना कैफशी करायला सुरुवात झाली. 2 / 9सलमान खानने तिला या चित्रपटाद्वारे लॉन्च केलं. जरीन खान लोकांना कतरिना कैफसारखी वाटत होती. ते तिच्यासोबत सारखी तुलना करायचे. यामुळेच जरीनला बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करता आली नाही. आता अभिनेत्रीने तिच्या मनातील दु:ख व्यक्त केलं आहे. 3 / 9जरीनने भारती टीव्हीवरील पॉडकास्टमध्ये तिचं पदार्पण, करिअर आणि इंडस्ट्रीबद्दल भाष्य केलं आहे. तिने सांगितलं की, वीरनंतर तिला खूप जणांच्या टीकेला सामोरं जावं लागलं. तो अनुभव खूपच वाईट होता. 4 / 9जरीन म्हणाली, 'सुरुवातीला माझी तुलना कतरिना कैफसोबत केली जात होती, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. माझ्यासाठी कतरिनाशी तुलना होणं ही मोठी गोष्ट होती. मात्र, कतरिनाशी झालेल्या तुलनेचा माझ्या करिअरवर खूप वाईट परिणाम झाला.'5 / 9'कतरिना कैफशी तुलना केल्यानंतर मला घराबाहेर पडण्याची भीती वाटत होती.' तिच्यासोबत होणारी तुलना नकारात्मक ठरल्याने जरीनला नंतर ओव्हर वेटचा टॅग देखील दिला गेला.6 / 9जरीनने या कारणामुळेच सुरुवातीला घरीच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र अभिनेत्रीने सांगितलं की ती जास्त काळ अस्वस्थ राहू शकत नाही. तिने यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. 7 / 9जरीन 'हम भी अकेले तुम भी अकेले' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. तिने हाऊसफुल २ आणि हेट स्टोरी ३ सारख्या चित्रपटातही काम केलं आहे. जे यशस्वी ठरले. जरीन सध्या इंडस्ट्रीपासून दूर आहे.8 / 99 / 9