Join us
Daily Top 2Weekly Top 5

Zanai Bhosle : आशा भोसलेंच्या नातीचे ग्लॅमरस Photos, अभिनेत्रीपेक्षा कमी नाही 'जनाई भोसले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 09:48 IST

1 / 8
ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (Zanai Bhosle) सुद्धा गायिका आहे. मात्र गाण्यापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंचीच जास्त चर्चा असते. जनाई एखाद्या अभिनेत्रीलाही टक्कर देईल इतकी सुंदर आहे.
2 / 8
आशा भोसलेंची नात जनाई अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. जनाईचे एकापेक्षा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतात. तसंच आज्जी आशा भोसले यांच्या ती अतिशय जवळची आहे हे नेहमी त्यांच्या फोटोंमधून दिसून येतं.
3 / 8
आशा भोसले यांचा मुलगा आनंद आणि सून अनुजा यांची जनाई ही मुलगी आहे. मात्र ती जास्त तिच्या आज्जीच्याच जवळ असते.
4 / 8
जनाईने आज्जी आशा भोसले यांच्यासोबत मिळून अनेक गाणी गायली आहेत. 'तेरा ही एहसास है' हे गाणं तिने श्री श्री रविशंकर यांना डेडिकेट केलं.याशिवाय जनाईने ढाकुमाकुम, बाप्पा मोरया अशी काही गाणी तिने गायली आहेत
5 / 8
जनाईला फिरण्याचीही आवड आहे. बर्फात खेळतानाचे किंवा बीचवरचे अनेक फोटो तिने इन्स्टाग्रावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांना तिचे फोटो भलतेच पसंतीस पडत आहेत.
6 / 8
जनाई भोसले आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांच्यातही खूप छान बॉंडिंग आहे. दोघींमध्ये बहिणीचं नातं आहे. अनेकदा त्यांचे एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
7 / 8
जनाई श्री श्री रविशंकर यांना गुरु मानते. अनेकदा आशा भोसले आणि जनाईने रविशंकर यांची भेट घेतली आहे. ते फोटोही कायम चर्चेचा विषय ठरले आहेत.
8 / 8
जनाई सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 50 हजार पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :आशा भोसलेपरिवारव्हायरल फोटोज्सोशल मीडिया