Join us
Daily Top 2Weekly Top 5

Year Ender 2025: कोणी अभिनेता, कोणी दिग्दर्शक! २०२५ मध्ये 'या' स्टारकिड्सने केलं सिनेसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:48 IST

1 / 7
२०२५ या वर्षात अनेक स्टारकिड्सने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यापैकी प्रमुख चर्चा झाली शाहरुखचा आर्यन खानची. आर्यनने अभिनेता न होता दिग्दर्शनाचा पर्याय निवडला आणि बॅड्स ऑफ बॉलिवूड वेबसीरिज दिग्दर्शित केली. या सीरिजची चांगलीच चर्चा झाली
2 / 7
२०२५ मध्ये एका सिनेमाने अनपेक्षित यश मिळवलं. हा सिनेमा म्हणजे 'सैयारा'. अहान पांडे हा अनन्या पांडेचा भाऊ. अहानच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं
3 / 7
याच वर्षात रिलीज होणाऱ्या इक्कीस सिनेमातून अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया पदार्पण करणार आहे. पण आता इक्कीसची रिलीज डेट १ जानेवारी २०२६ झाला आहे.
4 / 7
आझाद सिनेमातून अभिनेता अजय देवगणचा भाचा अमन देवगणने पदार्पण केलं होतं. अमन आणि राशा ही स्टारकिडची जोडी चांगलीच चर्चेत राहिली.
5 / 7
रवीना टंडनची लेक राशा थडानी हिने अभिषेक कपूर दिग्दर्शित आजाद सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. राशाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
6 / 7
२०२५ मध्ये आणखी एका स्टारकिडची चर्चा झाली. ती म्हणजे शनाया कपूर. अभिनेता संजय कपूर यांची लेक असलेल्या शनायाने आँखो की गुस्ताखियाँ सिनेमातून पदार्पण केलं
7 / 7
सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा, याशिवाय अभिनेत्री सारा अली खानचा भाऊ इब्राहीमने २०२५ मध्ये नादानियाँ आणि सरजमीन या सिनेमातून काम केलं.
टॅग्स :बॉलिवूडआर्यन खानशाहरुख खानअक्षय कुमारअनन्या पांडेअजय देवगणइब्राहिम अली खानसैफ अली खान