हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड महिका शर्मा काय करते? बोल्ड अदांमुळे रंगलीये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:18 IST
1 / 7नताशा स्टँकोविचसोबत घटस्फोटाच्या अफवांनंतर, हार्दिकच्या आयुष्यात एक नवीन नाव जोडले गेले आहे. ती म्हणजे महिका शर्मा2 / 7दिल्लीची रहिवासी असलेली महिका शर्मा ही एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने इकॉनॉमिक्स आणि फायनान्समध्ये शिक्षण घेतलंय.3 / 7महिकाने मॉडेलिंग आणि अभिनयाच्या जगात आपलं करिअर घडवलं आहे. तिने अनेक मोठ्या ब्रँड्ससाठी जाहिरातींमध्ये काम केले आहे.4 / 7महिका ही अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये आणि शॉर्ट फिल्म्समध्येही दिसली आहे. फॅशनच्या जगात तिने आपले नाव कमावले असून मनीष मल्होत्रा, अनीता डोंगरे आणि तरुण तहिलियानी यांसारख्या प्रसिद्ध डिझाइनर्ससाठी तिने रॅम्प वॉक केला आहे. 5 / 7महिकाने ओमंग कुमार यांच्या ‘पीएम नरेंद्र मोदी’ (2019) या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमात अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती6 / 7रेडिटवरील एका थ्रेडमध्ये महिकाच्या एका सेल्फीमध्ये मागे एक व्यक्ती दिसतोय, त्यावरून हार्दिक आणि महिका यांच्यातील संभाव्य नात्याबद्दलच्या चर्चांना वेग आला आहे.7 / 7सध्या हार्दिक आणि महिका दोघेही एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करतात आणि एकमेकांच्या पोस्ट्सना लाईक करतात. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अद्याप कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही.