रुग्णालयात दाखल असलेल्या उर्वशीला चाहत्याने पाठवले 1 लाख गुलाब
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:42 IST
1 / 10अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. 2 / 10काही दिवसांपुर्वी बोटाला छोटी जखम झाल्याने उर्वशी रुग्णालयात दाखल झाली. सोशल मीडियावर पोस्ट करत तिनं चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. 3 / 10उर्वशी रुग्णालयात असताना तिला तिच्या चाहत्यांनी जवळपास 1 लाख गुलाब भेट म्हणून दिले आहेत. सोशल मीडियावर तिने याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. 4 / 10उर्वशीने तिचा रुग्णालयातला व्हिडिओही शेअर केलाय. या व्हिडीओला कॅप्शन देत उर्वशीने म्हटलं की, माझ्यासाठी प्रार्थना करा. एका व्हिडीओमध्ये ती खुर्चीवर बसलेली असून ऑक्सिजन मास्क लावलं आहे.5 / 10उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो अपलोड करत लिहलं, 'मी लवकर बरी व्हावी यासाठी माझ्या एका चाहत्याने मला 1 लाख गुलाब पाठवले आहेत'.6 / 10उर्वशीने गुलाबांसोबतचे फोटो शेअर केल्यावरुन नेटकऱ्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केलंय. 7 / 10एका युजरने कमेंट करत म्हटलं की, 'हिने स्व:ताच हे सगळे गुलाब आणले असतील', तर एकाने लिहलं, 'हिचे चाहतेही वेडे आहेत वाटतं'. 8 / 10दरम्यान काही दिवसांपुर्वी उर्वशी ही बाथरुम व्हिडीओ लीकमुळे चर्चेत आली होती. उर्वशीचा तो एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं बोललं जातं होतं. 9 / 10 उर्वशी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.10 / 10 30 वर्षीय उर्वशीने सनी देओलच्या 'सिंग साहब द ग्रेट' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ती अनेक सिनेमांमध्येही झळकली आहे. आता ती आगामी 'ब्लॅक रोज' या तेलुगु आणि 'दिल है ग्रे' या हिंदी सिनेमात दिसणार आहे.