Join us

‘तुमसे अच्छा कौन है’फेम नैना आठवते का? आता झालाय कमालीचा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 19:29 IST

1 / 9
'तुमसे अच्छा कौन है' हा चित्रपट आठवतो का तुम्हाला? या चित्रपटातून अभिनेत्री आरती छाब्रिया घराघरात पोहोचली होती.
2 / 9
आरती उत्तम अभिनयासोबतच तिच्या क्युट स्माइलमुळेही विशेष लोकप्रिय होती. जवळपास २००२ ते २००८ या कालावधीत आरती कलाविश्वात सक्रीय होती. मात्र, त्यानंतर तिचा वावर कमी झाला.
3 / 9
आरतीने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं असून अचानकपणे तिने कलाविश्वापासून फारकत घेतली. त्यामुळे सध्या आरती काय करते? कशी दिसते असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडतात.
4 / 9
आरतीचा कलाविश्वातला वावर जरी कमी झाला असला तरीदेखील ती सोशल मीडियावर सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.
5 / 9
आरतीमध्ये आता पूर्वीपेक्षा कमालीचा बदल झाला आहे. ती पूर्वीपेक्षा आता जास्त ग्लॅमरस दिसू लागली आहे.
6 / 9
आरतीने बालकलाकार म्हणून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर तिने जवळपास ३०० पेक्षा जास्त टीव्ही जाहिरातीत काम केलं आहे.
7 / 9
'नशा ही नशा है, हॅरी आनंद की 'चाहत' आणि अदनान सामीच्या गाण्यातही ती झळकली होती.
8 / 9
आरतीने २००२ साली आलेल्या 'तुमसे अच्छा कौन है' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
9 / 9
'लज्जा', 'आवारा पागल दिवाना', 'राजा भैया', 'पार्टनर', 'हे बेबी' आणि 'मिलेंगे-मिलेंगे' या चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा