By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 19:51 IST
1 / 7बिग बॉस OTT 2 फेम मनीषा राणीने नुकतेच मुंबईत नवीन घर घेतले आहे. आता तिने यूट्यूबवर एक व्हिडीओ शेअर करून घराची झलक दाखवली. तिच्या घरात क्रीम रंगाच्या सोफ्यासह सोनेरी टेबल, कार्पेट आणि झुंबर बसवले आहे. मनीषाने तिच्या घरात गडद तपकिरी रंगाचे फर्निचर बसवले आहे. 2 / 7मनीषाला घर सजवण्यासाठी 20 दिवस लागले असल्याचं तिनं सांगितलं. याशिवाय तिनं घरासाठी 45 हजार रुपयांचे पडदे खरेदी केले आहेत.3 / 7मनिषानं घरात एक मोठा आरसा बसवला आहे. 4 / 7मॉर्डन अशा मनिषाच्या घरी सुंदर असं देवघरही आहे. चाहत्यांनी भेटवस्तू दिलेल्या वस्तूही तिने घरात ठेवल्या आहेत.5 / 7मनीषाचे घर अगदी प्रशस्त आहे. किचनपासून बेडरूमपर्यंत सर्व काही मनीषाने उत्तम प्रकारे डिझाइन केले आहे. तिनं आपल्या घरात एक फोटो वॉल तयार केली आहे. ज्यावर तिच्या जवळच्या व्यक्तीसोबतच्या फोटो फ्रेम लावलेल्या आहेत. 6 / 7तिचं मास्टर बेडरुमही अगदी सुंदर आहे. बेडशीट आणि पडदे तिनं सारख्या रंगाची लावली आहेत. शिवाय तिनं बेडच्या बाजूल लॅमलावले आहेत. त्यामुळे क्लासी असा लुक तिच्या बेडरुमला आला आहे. 7 / 7या आलिशान घरातील बाल्कनी मनिषाने लाइटिंग सजवली आहे.