Join us

तमन्ना भाटियाच्या फ्लॉलेस स्किनचं सिक्रेट आलं समोर, पिंपल्स आल्यावर चेहऱ्यावर लावते 'ही' गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 18:25 IST

1 / 10
ग्लॅमरस अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) ही तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते. तिचा ग्लोईंग आणि फ्लॉलेस स्किन अनेक चाहत्यांना आकर्षित करते.
2 / 10
पण अनेकांना प्रश्न पडतो की तमन्नाची त्वचा इतकी नितळ आणि परफेक्ट कशी काय आहे? अलीकडेच तमन्नाने एका मुलाखतीत काही खास गोष्टी शेअर केल्या.
3 / 10
विशेषतः पिंपल्स (Tamannaah Bhatia Pimples Remedy) आल्यावर ती जे उपाय करते, ते ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
4 / 10
लल्लनटॉपला दिलेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या स्कीन केअर रुटीनबद्दल सांगितलं.
5 / 10
तमन्ना म्हणाली, 'पिंपल आल्यानंतर त्या जागेवर सकाळी लाळ लावते. हो ते काम करतं. पण तो सकाळचा थुका असायला हवा. आपण दात घासण्यापूर्वीचा थुका असायला हवा'.
6 / 10
पुढे ती म्हणाली, 'मी डॉक्टर नाही, पण स्वत:चा अनुभव सांगतेय. तुम्ही सकाळी उठलेले असता त्यावेळी तुमच्या तोंडात अँटी बॅक्टीरियल एलिमेंट्स तयार झालेले असतात'.
7 / 10
तमन्ना सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अनेकदा त्वचेची काळजी कशी घ्यावी यासाठी चाहत्यांनी टिप्स देत असते.
8 / 10
तसचं तमन्ना फिटनेस प्रेमी असून वर्कआऊटचे व्हिडीओ ती सतत आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
9 / 10
तमन्ना डाएटसोबत जीममध्ये जाऊन वर्कआऊट करुन घाम गाळते अशाप्रकारे शरीराला चांगला आकार देण्यासाछी तमन्ना कसून मेहनत करताना दिसते.
10 / 10
दरम्यान, तमन्नाची पिंपलवर स्वत:ची लाळ लावण्याची ही पद्धत तुमच्यावर लागू होईलच असं नाही. त्यामुळे स्किन समस्यांसाठी स्वतः प्रयोग करण्याआधी तज्ज्ञ सल्ला घेणं केव्हाही उत्तम.
टॅग्स :तमन्ना भाटियासेलिब्रिटीब्यूटी टिप्सत्वचेची काळजी