Join us

साऊथच्या 'या' 7 अभिनेत्री करतात साईड बिझनेस; व्यवसायातून कमावतात कोटयवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 18:29 IST

1 / 8
कलाविश्वात सध्या असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच अन्य काही क्षेत्रांमध्येही कार्यरत आहेत. त्यामुळेच अभिनयाव्यतिरिक्त साईड बिझनेस करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्री कोणत्या ते पाहुयात.
2 / 8
पारुल यादव - कन्नड कलाविश्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पारुल यादव. कन्नड, मल्याळम आणि तामिळ अशा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पारुलने खासकरुन काम केलं आहे. ड्रीम्स या तामिळ चित्रपटातून दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पदार्पण करणारी पारुल अभिनेत्री असण्यासोबतच एक इंटेरिअर डिझायनर आहे. तिची स्वत: इंटीरिअर डिझायनर फर्म आहे.
3 / 8
प्रणिता सुभाष - प्रणिताने कन्नड, तेलुगू, तामिळ आणि हिंदी भाषांमध्ये काम केलं आहे. २०१० मध्ये तिने पोरकी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर तिने 'बावा', 'Attarintiki Daredi', 'Enakku Vaaitha Adimaigal' या चित्रपटांमध्ये काम केलं. प्रणिता एक हॉटेल व्यावसायिक आहे. बंगळुरूमध्ये तिचं एक आलिशान असं रेस्तराँ आहे.
4 / 8
काजल अग्रवाल- काजल अग्रवाल हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. काजलने साऊथ चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. काजलचा एक ज्वेलरी ब्रँड आहे. 'Marsala' असं तिच्या ब्रँडचं नाव असून तिच्या बहिणीसह ती हा ब्रँड चालवते.
5 / 8
रकुल प्रीत सिंह - रकुल प्रीत सिंह प्रोफेशनल लाइफसोबतच अनेकदा पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते. रकुल दाक्षिणात्य कलाविश्वातील महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये फी घेते. तसंच ती साईड बिझनेसही करते. रकुलचे तीन ट्रेनिंग जीम आहेत. यात २ हैदराबादमध्ये आणि १ विशाखापट्टणम येथे आहे.
6 / 8
तमन्ना भाटिया - तमन्ना भाटिया हे दाक्षिणात्य कलाविश्वातील मोठं नाव आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून तमन्ना कलाविश्वात सक्रीय आहे. अनेक गाजलेले चित्रपट देणारी तमन्नाचा ज्वेलरी ब्रँड आहे. 'WITE & GOLD' असं तिच्या ब्रँडचं नाव असून बऱ्याच वर्षांपासून ती हा व्यावसाय करत आहे.
7 / 8
निक्की गलरानी - तामिळ सिनेमाची डार्लिंग या नावाने निक्की गलरानी ओळखली जाते. निक्कीचं बंगळुरुमध्ये एक रेस्ट्रो-कॅफे आहे.
8 / 8
श्रुती हासन - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासान यांची लेक श्रुती हासन हिनेदेखील साऊथमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, अभिनयासह तिचं एक प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. या प्रोडक्शन हाऊसमध्ये शॉर्ट फिल्म, अॅनिमेशन्स फिल्म, व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जातं.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसिनेमा