Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sanoj Mishra : "मी जेलमध्ये गेलो, माझ्यावर ९.५ कोटींचं कर्ज; मोनालिसा अशिक्षित ..."; दिग्दर्शकाचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:57 IST

1 / 12
'महाकुंभ गर्ल' मोनालिसाच्या लग्नावरून सुरू असलेला वाद आता वाढतच आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्या 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटातून ती अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार होती.
2 / 12
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच मोनालिसाने आपल्या मुस्लिम बॉयफ्रेंडशी लग्न केल्यामुळे सनोज मिश्रा यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मते त्यांचा चित्रपट रोखण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित कट आहे.
3 / 12
'न्यूज १८' ला दिलेल्या मुलाखतीत सनोज मिश्रा यांनी आपलं दुःख व्यक्त केलं. ते म्हणाले, 'मोनालिसा 'लव्ह जिहाद'ची बळी ठरली आहे कारण ती महाकुंभमधून आली होती. PFI सारखी संघटना अशा गोष्टींसाठी फंडिंग करत आहे.'
4 / 12
'हिंदू धर्मात प्रगती करणाऱ्या छोट्या शहरांतील मुलींना टार्गेट करणं हेच त्यांचं काम आहे. मोनालिसाचा पती फरमान हा देखील PFI शी संबंधित आहे, याची चौकशी झाल्यास सत्य बाहेर येईल. अडचण अशी आहे की मोनालिसा आणि तिचं कुटुंब अत्यंत साधं आहे.'
5 / 12
'कुटुंबासोबत काय घडलं, हे त्यांना समजलंच नाही. गेल्या ५-६ महिन्यांत परिस्थिती अशी बदलली की, मोनालिसाला आणि तिच्या कुटुंबाला माझ्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलं, जेणेकरून हे लोक आपला डाव साधू शकतील. माझ्यापासून अनेक गोष्टी लपवल्या गेल्या.'
6 / 12
सनोज यांनी पुढे सांगितलं की, त्यांचा चित्रपट 'द डायरी ऑफ मणिपूर' हा धर्मांतराच्या विषयावरच आधारित आहे, म्हणूनच त्यांना टार्गेट केलं जात आहे.
7 / 12
'या चित्रपटासाठी मी जेलमध्ये गेलो, अपमान सहन केला. आज माझ्यावर ९.५ कोटींचे कर्ज आहे. माझी दोन वर्षांची मेहनत धुळीस मिळाली आहे.'
8 / 12
'चित्रपट पूर्ण झाला असून फक्त एक गाणं शूट करायचं बाकी आहे. पण आता मला मोनालिसासोबत कधीच काम करायचं नाही. तिला चित्रपटात घेणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात चुकीचा निर्णय होता.'
9 / 12
'मी तिला मुलगी मानायचो, पण आता मला त्याची लाज वाटते. ती अशिक्षित आहे, तिला भडकवणं खूप सोपं आहे. तिला पाहून आता इतर मुलीही अशाच प्रकारे लग्न करतील.'
10 / 12
'माझा चित्रपट आता कधी प्रदर्शित होईल, हे मला माहित नाही. मला वाटत नाही की, आता कोणताही डिस्ट्रीब्यूटर मिळेल. हे लग्न जाणीवपूर्वक चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी लावून देण्यात आलं.'
11 / 12
दिग्दर्शकाने माहिती दिली की, त्यांनी मोनालिसाला ट्रेनिंग, तिला इंदूरमधून ग्लॅमरच्या जगात आणणं आणि चित्रपट बनवणं यावर आतापर्यंत ९.५ कोटी रुपये खर्च केले आहेत.
12 / 12
'मोनालिसा कामाबद्दल कधीच सीरियस नव्हती. तिच्याकडून काम करून घेणं खूप कठीण होतं. मी पूर्णपणे अडकलो होतो. माझा त्यामध्ये कोणताही स्वार्थ नव्हता, मी फक्त पैसे खर्च करत गेलो' असंही सनोज मिश्रा यांनी हताशपणे सांगितलं.
टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूडलग्न