Join us
Daily Top 2Weekly Top 5

"५ आठवडे साखर पूर्ण बंद केली आणि चेहऱ्याची..."; संजय दत्तच्या लेकीचा खुलासा, फोटो पाहून सर्वजण थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:23 IST

1 / 7
संजय दत्त हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता. संजूबाबा म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. संजय दत्तने साकारलेली राजा शिवाजी मधील अफजलखानाची भूमिका सध्या चांगलीच गाजतेय. अशातच संजूबाबाच्या लेकीचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बघून सर्वजण थक्क झाले आहेत.
2 / 7
संजूबाबाची मुलगी त्रिशाला दत्त ही मनोरंजन विश्वापासून तशी दूरच असते. परंतु त्रिशाला नुकत्याच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. त्रिशालाने सोशल मीडियाच्या माध्यमातून साखर बंद केल्यानंतर काय फरक झाला, हे सांगितलं आहे.
3 / 7
त्रिशालाने तिच्या सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्रिशाने Before आणि After असे फोटो पोस्ट करुन चाहत्यांना तिच्या ट्रान्सफॉर्मेशन मागील रहस्य सांगितलं आहे.
4 / 7
त्रिशालाचा इन्स्टाग्रामवरील एक फोटो २८ मार्च २०२६ चा आहे. तर दुसरा फोटो १ मे २०२६ चा आहे. महिन्याभरात त्रिशालाच्या चेहऱ्यात बराच फरक पडला असून ती आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतेय, अशा चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
5 / 7
त्रिशालाच्या म्हणण्यानुसार, चेहरा का सुजलाय हे तिला कळत नव्हतं. त्यामुळे तिने तिच्या डाएटमधून साखर पूर्णपणे वजा केली. याचा परिणाम असा झाला की, त्रिशालाच्या चेहऱ्यावरची सूज उतरली. तब्बल ५ आठवडे त्रिशालाने साखर खाल्ली नाही. याचा चांगला परिणाम दिसून आला.
6 / 7
यामुळे शरीरात साठून राहिलेले अतिरिक्त पाणी (Excess water) बाहेर पडण्यास मदत झाली, ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येणारी सूज आता पूर्णपणे निघून गेली आहे. त्यामुळे एकूणच साखर बंद केल्याने झालेल्या फायद्यांचा खुलासा त्रिशालाने केला.
7 / 7
त्रिशाला ही संजय दत्तची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिची मुलगी आहे. ऋचा यांचं १९९६ साली कॅन्सरने निधन झालं. त्यानंतर त्रिशाला वडिलांच्या आणखी जवळ आली.
टॅग्स :संजय दत्तहेल्थ टिप्सआहार योजनाफिटनेस टिप्सबॉलिवूड