Join us

300 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड्स, तीन वेळा लग्न; सिनेमापेक्षा कमी नाही संजूबाबाचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 15:59 IST

1 / 7
बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य अतिशय गुंतागुंतीचं असतं. कधी कोणाचं बिनसतं तर कधी कुणाचं जुळतं. त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायम अनेकदा चव्हाट्यावरही येताना दिसतं. अभिनेता संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य हे त्याच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त चर्चेत राहिलं आहे.
2 / 7
'वास्तव','मुन्नाभाई एमबीबीएस','खलनायक','साजन' असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य कायम वादळी राहिलं आहे. 'वास्तव'मुळे संजयला खरी ओळख मिळाली. तो स्वत: वास्तवला त्याच्या करिअरमधली बेस्ट फिल्म समजतो.
3 / 7
संजय दत्तचा फिटनेसही जबरदस्त आहे. 'अग्निपथ' सिनेमात त्याने साकारलेला कांचा बघून प्रेक्षकांचाही थरकाप उडतो. वयाच्या ६४ व्या वर्षीही त्याचा फिटनेस कायम आहे. संजय दत्तचा वेगळा चाहतावर्ग आहे. संजू बाबा असंही त्याला इंडस्ट्रीत म्हणतात.
4 / 7
संजूचं तीन वेळा लग्न झालं आहे. 1987 साली तो अभिनेत्री रिचा शर्मा सोबत लग्नबंधनात अडकला. मात्र १९९६ मध्ये रिचाचं ब्रेन ट्युमरने निधन झालं. त्यांना त्रिशला ही मुलगी आहे जी अमेरिकेत असते. त्रिशला संजय दत्तची पहिली मुलगी आहे.
5 / 7
संजय दत्तने आयुष्यात ३०० पेक्षा जास्त मुलींना डेट केले आहे. अंदाजे हा आकडा ३०८ असल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं. टीना मुनीम ते माधुरी दीक्षित अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. माधुरीसोबत तर त्याचं लग्नही झालं असं असतं मात्र १९९३ च्या बॉम्बस्फोटात खटल्यात संजय दत्त अडकला आणि त्यांचं नातं तुटलं.
6 / 7
नंतर 1998 साली त्याने एअर हॉस्टेस रिया पिल्लई सोबत लग्न केले, मात्र हे नातं टिकलं नाही आणि २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.१० वर्षांचा त्यांचा संसार मोडला.
7 / 7
तर २००८ सालीच संजू बाबा मान्यतासोबत लग्नबंधनात अडकले.गोवा येथे त्यांचं लग्न झालं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असे जुळे झाले. मान्यतासोबत सुखाचा संसार सुरु असतानाच एक वादळ आलं. संजयला फुप्फुसांचा कर्करोग झाला. मुंबईतच त्याने उपचार घेतले आणि त्यावर मात केली.
टॅग्स :संजय दत्तबॉलिवूडपरिवार