Join us
Daily Top 2Weekly Top 5

Sandeepa Virk : "मी देवाकडे प्रार्थना करायची की माझा मृत्यू व्हावा"; अभिनेत्रीने सांगितला जेलमधील भयंकर अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 15:58 IST

1 / 11
अभिनेत्री, इन्फ्लुएन्सर आणि कॉस्मेटोलॉजिस्ट संदीपा विर्क गेल्या वर्षी मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे प्रचंड चर्चेत आली. २०२५ मध्ये ईडीने तिला ६ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
2 / 11
तिहार जेलमध्ये चार महिन्यांहून अधिक काळ घालवल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. आता संदीपाने जेलमधील त्या भयंकर दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला असून तिथे स्वतःच्या मृत्यूसाठी प्रार्थना करत असल्याचं म्हटलं आहे.
3 / 11
संदीपा विर्कने अलीकडेच सिमरन जोत मक्कर यांना दिलेल्या मुलाखतीत जेलमधील अनुभवावर भाष्य केलं. जेलबद्दल विचारलं असता अभिनेत्री खूप भावूक झाली.
4 / 11
'तिहार ही एक अशी जागा आहे जिथे मी माझ्या शत्रूलाही पाठवू इच्छित नाही. मी देवाला आणि स्वतःला सतत प्रश्न विचारायची की, माझ्यासोबत असं का घडतंय? मी याला कर्माचं फळ मानलं' असं सांगितलं.
5 / 11
संदीपाने म्हटलं की, जेव्हा तिचे आई-वडील तिला भेटायला यायचे, तेव्हा तिला सर्वात जास्त त्रास व्हायचा. ती म्हणाली, 'मी देवाकडे प्रार्थना करायची की माझा मृत्यू व्हावा.'
6 / 11
'जेव्हा तुमचे आई-वडील तुम्हाला जेलमध्ये भेटायला येतात, तो क्षण सर्वात भयानक असतो. माझ्यामुळे त्यांना तिथे यावं लागलं, यासाठी मी त्यांची माफीही मागितली.'
7 / 11
'माझ्या संकटाच्या काळात माझे आई-वडील आणि भावंडं माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, कारण त्यांना माहिती होतं की मी कोण, काय आहे, त्यांनी मला समजून घेतलं.'
8 / 11
संदीपाने जेलमधील जीवन मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारं असल्याचे वर्णन केलं आणि म्हटलं की त्याचा तिच्या आरोग्यावर इतका परिणाम झाला आहे की ती मदतीशिवाय उभंही राहू शकत नव्हती.
9 / 11
अभिनेत्रीने सांगितलं की, कैदी जमिनीवर झोपतात, वॉशरूम घाणेरडं असतं आणि जेवण खूप खराब होतं. तिने असेही म्हटलं की काही महिला पोलीस अधिकारी दयाळू होत्या, तर काही कैद्यांवर राग काढतात.
10 / 11
संदीपाने 'हनी ट्रॅप स्क्वॉड' सारख्या वेब सिरीज आणि 'मनकथा' व 'शिकार' सारख्या चित्रपटात काम केलं आहे. मात्र अटकेनंतर फिल्म इंडस्ट्रीतील समीकरणं कशी बदलली, यावरही तिने भाष्य केलं.
11 / 11
ती म्हणाली, 'अटकेनंतर अनेकांनी मला अनफॉलो केलं, पण त्याने मला फरक पडत नाही. पूर्वी काही मोठे निर्माते म्हणायचे की, 'संदीपा, मी तुला स्टार बनवू शकतो'. मी त्यांना उत्तर द्यायची की, ज्याने तुम्हाला बनवलंय, तोच मलाही बनवेल. कोणीही माणूस कोणाला घडवू शकत नाही, ते फक्त मदत करू शकतात.'
टॅग्स :बॉलिवूडतुरुंगगुन्हेगारी