Join us  

बॉलिवूडचे 'हे' ६ कलाकार आहेत उत्तम चित्रकार; पेंटिंग्ज पाहून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 2:17 PM

1 / 7
बॉलिवूडमध्ये असे असंख्य कलाकार आहेत जे त्यांच्या उत्तम अभिनयासोबतच अन्य गुणवैशिष्ट्यांसाठीही ओळखले जातात. यात सध्या बॉलिवूडचे असे सहा सेलिब्रिटी आहेत जे अभिनयासोबतच त्यांच्या चित्रकलेमुळे ओळखले जातात. म्हणूनच, उत्तम पेंटर असलेले हे कलाकार कोणते ते पाहुयात.
2 / 7
वामिका गब्बी - उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी वामिका गब्बी एक अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम चित्रकारही आहे. वामिका फावल्या वेळात तिची चित्रकलेची आवड जपत असते. विशेष म्हणजे तिच्या बॅगमध्ये कायम रंग आणि पेंटिंगचा सेट ठेवते. तिच्या गोधा या चित्रपटाच्या सेटवरही तिने तिची चित्रकलेची आवड जोपासल्याचं पाहायला मिळालं होतं.
3 / 7
तारा सुतारिया - हॉटनेसमुळे चर्चेत राहणारी तारा सुतारिया फावल्या वेळात चित्र काढते. विशेष म्हणजे ती एक उत्तम चित्रकार असेल यावर अनेकांचा विश्वास नाही. परंतु, ती उत्तम चित्र रेखाटते.
4 / 7
सोनाक्षी सिन्हा - बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा एक उत्तम चित्रकार आहे. सोनाक्षी अनेकदा तिच्या चित्रातून वेगवेगळे भाव प्रकट करण्याचा प्रयत्न करत असते. सोशल मीडियावर तिच्या काही चित्रांचे फोटो व्हायरलही झाले आहेत. विशेष म्हणजे सोनाक्षीने तिच्या चित्रांचा लिलाव करुन त्यातून आलेले पैसे गरीबांसाठी दानही केले आहेत.
5 / 7
सिध्दांत चतुर्वेदी - गली बॉय या चित्रपटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने उदयास आलेला सिद्धांत चतुर्वेदी उत्तम चित्रकार आहे. अलिकडेच त्याने इन्स्टाग्रामवर त्याच्या एका चित्राचा फोटो शेअर केला होता.
6 / 7
इलियाना डिक्रूझ - उत्तम अभिनय कौशल्य,सौंदर्य आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी इलियाना सुंदर चित्र काढते. इलियाना अनेकदा सोशल मीडियावर तिच्या चित्रांचे फोटो शेअर करत असते.
7 / 7
सलमान खान- दबंग खान, भाईजान अशा एक ना अनेक नावाने ओळखला जाणार सलमान अनेक गोष्टींमध्ये निपूण आहे. उत्तम अभिनयासोबतच सलमान एक गायक, चित्रकारही आहे. सलमानने आतापर्यंत अनेक पेटिंग्ज काढल्या असून त्याचा लिलाव केला आहे. या लिलावात मिळालेले पैसे तो बिंग ह्युमन या संस्थेसाठी वापरतो.
टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा