By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 14:10 IST
1 / 7सलमान खानच्या सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्नाबद्दल आणि मातृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे. त्यामुळे ही अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे2 / 7बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री डेझी शाह सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आपले 'एग्ज फ्रीज' (Eggs Freeze) केले असून, भविष्यात कधीही आई होण्याची तयारी असल्याचंही सांगितलंय.3 / 7कोणत्याही नात्यात एक स्थैर्य असणं गरजेचं आहे. त्यामुळे मला असा जोडीदार हवाय जो आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, असंही डेझी शाह म्हणाली.4 / 7फक्त कुटुंंब हवंय म्हणून लग्न करणं गरजेचं नाहीये. त्यामुळे मी एग्ज फ्रीज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी जेव्हा इच्छा असेल तेव्हा मुलांना जन्म देईल, असं डेझी शाह म्हणाली.5 / 7'सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही. हा निर्णय सध्या मी देवावर सोडला आहे.'', असंही डेझी शाह पुढे म्हणाली.6 / 7डेझी शाह 'जय हो' नंतर 'रेस ३' आणि काही प्रादेशिक चित्रपटांमध्ये दिसली होती. तसेच तिने 'खतरो के खिलाडी' सारख्या रिअॅलिटी शोमध्येही आपला जलवा दाखवला आहे.7 / 7डेझी शाहच्या आधी एकता कपूर, तुषार कपूर, प्रियांका चोप्रा आणि मोना सिंग यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी सरोगसी किंवा एग्ज फ्रीजिंगचा पर्याय स्वीकारला आहे. डेझीच्या या स्पष्टवक्तेपणामुळे सोशल मीडियावर तिचे कौतुक होत आहे.