Join us
Daily Top 2Weekly Top 5

"अनेक लोकांनी माझ्या ओठांची..." अभिनेत्री संयमी खेरने सांगितलं बॉलिवूडचं वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 12:01 IST

1 / 6
अभिनेत्री संयमी खेर (Saiyami Kher) सध्या तिच्या आगामी आगामी 'घूमर' सिनेमामुळे चर्चेत आहे. संयमीने आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संयमी काही मोजक्या सिनेमांमध्ये दिसली मात्र तरी तिने आपला ठसा उमटवला.
2 / 6
'मिर्जिया' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या संयमीने तेलुगू सिनेमातही काम केलं आहे. अभिनयाचा वारसा नसताना ती या क्षेत्रात कशी आली आणि तिला कोणकोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला हे तिने एका मुलाखतीत सांगितलं.
3 / 6
आपला अनुभव सांगताना संयमी म्हणाली, 'जेव्हा मी सुरुवात करत होते बऱ्याच लोकांनी मला ओठ आणि नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा मी १८ वर्षांची होते. इतक्या कमी वयात असे सल्ले दिल्याने मनावर परिणाम होतो. हा अनुभव माझ्यासाठी असा होता जसे काय एखादा खेळ सुरु करण्याअगोदर काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.
4 / 6
पण मला खरं तर या नियमांचा फारसा त्रास झाला नाही. पण मला आशा आहे एक ना एक दिवस हे नियम नाहीसे होतील. आपल्याला शोबीजमध्ये विविधता स्वीकारण्याची गरज आहे.
5 / 6
तसंच माझ्यासाठी नेहमी माझं कुटुंब आणि मित्रपरिवार यांना काय वाटतं हेच महत्वाचं आहे. तेच असे लोक असतात जे खरी प्रतिक्रिया देतात. सकारात्मक टीकाही गरजेची आहे जी तुम्हाला चांगलं चांगलं बनवते. मी खूप नशिबवान आहे की माझ्या आसपासच्या लोकांनी मला कठीण प्रसंगी साथ दिली.
6 / 6
संयमी खेर आणि अभिषेक बच्चन यांचा 'घूमर' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. संयमीने यामध्ये दिव्यांग क्रिकेटरची भूमिका साकारली आहे तर अभिषेक बच्चन तिच्या कोचच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा ट्रेलर सर्वांनाच खूपच पसंती पडलाय. आर. बाल्की यांनी सिनेमाचं दिग्दर्शिन केलं असून 18 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
टॅग्स :संयमी खेरबॉलिवूडअभिषेक बच्चन