Join us

"लीड रोल मिळवण्यासाठी छोट्या कपड्यात करू शकत नाही डान्स", रिद्धी डोगराने स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:47 IST

1 / 9
रिद्धी डोगरा हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. आता ती बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये दिसत आहे. रिद्धीने शाहरुख खानच्या 'जवान'पासून ते विक्रांत मॅसीच्या 'द साबरमती रिपोर्ट'पर्यंतच्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2 / 9
रिद्धी डोगरा तिच्या चित्रपटांची निवड खूप विचारपूर्वक करते. द इंडियन एक्स्प्रेसशी झालेल्या संभाषणात तिने स्क्रिप्ट निवडताना तिच्या मनात काय विचार येतात ते सांगितलं.
3 / 9
अभिनेत्री म्हणाली की, तिला अशा भूमिका करायच्या आहेत ज्या प्रभावशाली असतील. तिला टाईपकास्ट व्हायचं नाही असंही तिने सांगितलं. असं घडण्याआधीच ती गोष्टी बदलते.
4 / 9
रिद्धीला विचारण्यात आलं की, तिला हिंदी चित्रपटात मुख्य भूमिका करायची आहे का? त्यावर ती म्हणाली, 'खरं सांगायचं तर त्या प्रभावी भूमिका नसतील तर नाही.'
5 / 9
'मी शॉर्ट स्कर्टमध्ये डान्स करू शकत नाही आणि मला माझ्या शरीराचे काही भाग माझ्या कपड्यांमधून दिसावेत अशी इच्छा नाही. मला कोणत्याही प्रकारे ऑब्जेक्टीफाय व्हायचं नाही.'
6 / 9
ती पुढे म्हणाली की, तिने आपल्या अभिनय प्रवासात अनेक सुंदर भूमिका केल्या आहेत. अशा परिस्थितीत ती कमकुवत स्त्रीची भूमिका करू शकत नाही. मी असं काही करणार नाही.
7 / 9
रिद्धी डोगरा 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात शेवटची दिसली होती. लवकरच ती फवाद खान स्टारर 'अबीर गुलाल' या चित्रपटात दिसणार आहे.
8 / 9
रिद्धी डोगराचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करत असते.
9 / 9
टॅग्स :बॉलिवूडटिव्ही कलाकार